पंतप्रधानांनी घेतली इस्रायलच्या राष्ट्रपतींची भेट

February 26th, 09:00 pm

यावेळी पंतप्रधानांनी 2017 मधील आपला इस्रायल दौरा आणि 2023 मधील दुबई दौऱ्याच्या वेळी राष्ट्रपती हर्झोग यांच्यासोबत झालेल्या मागील भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. भारत - इस्रायलमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले असून, ते आता शांतता, नवोन्मेष आणि समृद्धीसाठी विशेष धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर पोहोचले असून, ही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांची एक नवी सुरुवात असल्याची दखलपूर्ण नोंद दोन्ही नेत्यांनी या भेटीत घेतली. यातून दोन्ही देशांमधील दृढ विश्वास, सामायिक लोकशाही मूल्ये आणि विशेष मैत्रीचे प्रतिबिंबही उमटत असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यापार आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि उपक्रम, संरक्षण आणि सुरक्षा, तसेच दहशतवादविरोधातील लढा या क्षेत्रांमधील विद्यमान सहकार्याबद्दलही दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

इस्रायल दौऱ्यासाठी प्रस्थान करण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

February 25th, 08:28 am

माझे प्रिय मित्र पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निमंत्रणावरून, मी 25-26 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलला शासकीय भेट देणार आहे.

पंतप्रधानांचा इस्रायल दौरा

February 24th, 05:34 pm

इस्रायलचे पंतप्रधान, महामहिम बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलला अधिकृतपणे भेट देतील. पंतप्रधानांचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे.

नेसेटचे विरोधी नेते इसक हर्झोग यांनी जेरुसेलम इथे पंतप्रधानांची भेट घेतली.

July 05th, 07:32 pm

नेसेटचे विरोधी नेते इसक हर्झोग यांनी जेरुसेलम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलमध्ये जेरुसेलम इथे भेट घेतली.