'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)
June 28th, 11:30 am
'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.पंतप्रधानांनी योगाचा परिवर्तनीय प्रभाव विशद करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
June 22nd, 08:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय योगदिनाला मिळालेले अद्वितीय यश म्हणजे योग हा जगभरातील लाखो लोकांना केवळ शारीरिक आरोग्य मिळवण्यासाठी मदत करत नाही तर त्यांना आत्मविश्वासाने सकारात्मक आयुष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत असल्याचे द्योतक आहे.पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र एक जागतिक सोहळा म्हणून साजरा केल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
June 21st, 10:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिन 2026 ला एक जागतिक सोहळा म्हणून साजरा केल्याबद्दल जगभरातील लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेवा तीर्थ येथे योग सत्राचे आयोजन
June 21st, 03:51 pm
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नवी दिल्लीत सेवा तीर्थ येथे योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते.कोलकाता येथे 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' युद्धनौकांच्या जलावतरण समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 12:51 pm
आजचा दिवस अनेक अर्थांनी विशेष आहे. संपूर्ण जग 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करत आहे. मला आनंद आहे की या निमित्ताने मला बंगालच्या या महान भूमीवर येण्याची संधी मिळाली. ही ती भूमी आहे जिने भारताच्या विचारांना नवी दिशा दिली, भारताच्या पुनर्जागरणाला गती दिली आणि जिने शतकानुशतके भारताला सागरी मार्गाने जगाशी जोडले. आज याच भूमीवर 'आत्मनिर्भर भारत', 'सुरक्षित भारत' आणि 'विकसित भारत' शी संबंधित एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम होत आहे. काही वेळापूर्वीच 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' यांचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. योगायोगाने, 21 जून हा दिवस 'जागतिक जलविज्ञान दिन' (World Hydrography Day) म्हणूनही साजरा केला जातो. आणि हा एक विलक्षण योगायोग आहे की याच दिवशी भारताचे सर्वात प्रगत हायड्रोग्राफी जहाज, 'आयएनएस संशोधक ' नौदलात सामील करण्यात आले आहे. मी भारतीय नौदल, या प्रकल्पांशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ, अभियंते, कामगार आणि माझ्या प्रिय देशवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता इथे श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर स्वदेशी रचना आणि स्वदेशी बनावटीच्या तीन जहाजांचे – आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय यांचे जलावतरण
June 21st, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर, स्वदेशी बनावटीच्या आणि रचनेच्या तीन नौदल जहाजांचे - 'आयएनएस दुनागिरी' (एक प्रगत 'स्टेल्थ' फ्रिगेट), 'आयएनएस संशोधक' (एक मोठे टेहळणी जहाज) आणि 'आयएनएस अग्रय' (पाणबुडी-विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका ) जलावतरण करण्यात आले. या जहाजांच्या समावेशामुळे देशाच्या नौदल क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल , सागरी क्षेत्राप्रती जागरूकता वाढेल आणि भू-राजकीय धोक्यांपासून आपल्या किनारपट्टीच्या जलक्षेत्राची सुरक्षा अधिक मजबूत होईल. या तिन्ही जहाजांचे संरेखन भारतीय नौदलाच्या 'वॉरशिप डिझाइन ब्युरो'ने केले असून त्यांची बांधणी कोलकात्यातील 'गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स' (GRSE) द्वारे करण्यात आली; यामध्ये 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह भारतीय उद्योगांचा मोठा सहभाग होता. 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर असलेली ही जहाजे आत्मनिर्भरतेप्रति भारताच्या वचनबद्धतेचा एक उत्तम दाखला आहेत.12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन: कोलकाता येथील काही झलक
June 21st, 06:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्याच्या ऐतिहासिक 'रेड रोड'वर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. मानवतेला मिळालेली भारताची ही अमूल्य देणगी साजरी करण्यासाठी ते सर्व स्तरांतील हजारो नागरिकांमध्ये सहभागी झाले होते. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले; योग हा संतुलन, निरामय आयुष्य आणि मानवी एकतेचा मार्ग असल्याचे सांगत त्यांनी यंदाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग यावर विशेष भर दिला.पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 06:45 am
आदरणीय राज्यपाल आर. एन. रवी जी, उर्जावान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी प्रतापराव जाधव जी, मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, कोलकाता येथे जमलेले सर्व सहभागी, तसेच भारतभरातून आणि जगभरातून या योग उत्सवात सहभागी होणारे सर्वजण आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालच्या कोलकाता मधील 'रेड रोड' येथे 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन
June 21st, 06:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथील 'रेड रोड'वरून 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे नेतृत्व केले. मोदी हजारो योग साधकांसोबत 'सामायिक योग प्रोटोकॉल' सत्रात सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरातील लोकांना शुभेच्छा देताना मोदी यांनी नमूद केले की, 21 जून हा दिवस जगाच्या अनेक भागांमध्ये वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि योगच्या माध्यमातून मानवतेचा एक सर्वात मोठा सामूहिक उत्सवाचा दिवसही बनला आहे.The restoration of Bengal's glory has begun: PM Modi in Tarakeswar during Paschimbanga Divas
June 20th, 05:13 pm
At Paschimbanga Divas in Hooghly, PM Modi extended his greetings to the people and launched development projects across key sectors. He also released the 23rd PM-KISAN instalment worth over ₹18,880 crore for more than 9.44 crore farmers. He paid tribute to Dr. Syama Prasad Mookerjee and highlighted Eastern India’s development under Mission Purvodaya.पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी इथे आयोजित पश्चिम बंग दिनाच्या सोहळ्यात झाले सहभागी
June 20th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिमबंग दिन सोहळ्यात सहभागी झाले . हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतींशी जोडले गेलेल्या ऐतिहासिक ठिकाणी या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगाल: वारसा, सलोखा आणि विकास अशी यंदाच्या पश्चिमबंग दिवसाची मुख्य संकल्पना होती. ही संकल्पना पश्चिम बंगालची सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सलोखा आणि विकासात्मक आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली.Odisha is emerging as a gateway to growth and prosperity in eastern India: PM Modi in Pahadpur
June 20th, 01:10 pm
The President, Smt. Droupadi Murmu and the Prime Minister, Shri Narendra Modi visited Pahadpur village in Mayurbhanj district today. The President and the Prime Minister offered prayers at the sacred groves Santhali Jahera and Ho Jahera, Skill Centre and Pahadpur School. The President and Prime Minister participated in a programme at Rairangpur in Mayurbhanj district, marking the completion of two years of the Government of Odisha. The theme of the programme is “Vikas ra Dhara, Odisha Sara”. Shri Modi inaugurated and laid the foundation stone of various development projects worth over ₹47,600 crore.ओदिशा राज्य सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
June 20th, 01:00 pm
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या पवित्र उपवनांत, तसेच हो जाहेरा कौशल्य केंद्रात आणि पहाडपूर शाळेत जाऊन प्रार्थना केली. यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतला. ओदिशा राज्य सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विकास रा धारा, ओदिशा सारा अशी या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी इथे आयोजित पश्चिम बंग दिनाच्या सोहळ्यात झाले सहभागी
June 19th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिमबंग दिन सोहळ्यात सहभागी झाले . हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतींशी जोडले गेलेल्या ऐतिहासिक ठिकाणी या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगाल: वारसा, सलोखा आणि विकास अशी यंदाच्या पश्चिमबंग दिवसाची मुख्य संकल्पना होती. ही संकल्पना पश्चिम बंगालची सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सलोखा आणि विकासात्मक आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली.India-France partnership is emerging as a strong pillar of trust, stability and cooperation: PM Modi in Paris
June 18th, 11:41 pm
Addressing the Indian community in Paris, PM Modi highlighted India’s transformative growth over the past 12 years across infrastructure, digital technology, manufacturing, defence, space, innovation, healthcare and social development. He underscored the growing strength of the India-France Strategic Partnership, praised the Indian diaspora for serving as a vital bridge between the two nations and highlighted yoga and football as bonds connecting India and France.पॅरीसमधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन
June 18th, 09:30 pm
पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.सलग सर्वाधिक कार्यकाळासाठी निवडून आलेले पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मंत्रिमंडळाने केला मंजूर
June 10th, 01:50 pm
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 10 जून, 2026 हा दिवस भारतीय लोकशाहीच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. सर्वाधिक कालावधीसाठी देशाचे निर्वाचित पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. निर्वाचित पंतप्रधान म्हणून 4,399 दिवसांच्या सलग सेवेचा विक्रम प्रस्थापित करून त्यांनी 1952 ते 1964 या काळात 4,398 दिवस सलग सेवा बजावलेल्या जवाहरलाल नेहरू यांचा पूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की, हा प्रसंग भारताची लोकशाही जाणीव, जनतेचा विश्वास आणि सार्वजनिक सहभागाच्या शक्तीचे प्रतीक आहे, तसेच 'राष्ट्र प्रथम' या संकल्पाने प्रेरित नेत्याला लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याचे प्रतिबिंब आहे.Yoga is the best way to maintain a healthy lifestyle with minimal expense: PM Modi at World Yogasana Championship in Ahmedabad
June 04th, 06:41 pm
PM Modi inaugurated the first World Yogasana Championship in Ahmedabad, calling yoga India’s timeless gift to humanity and expressing confidence that Yogasana will gain recognition as a competitive sport in global multi-sport events, including the Olympics. Highlighting yoga’s role in health, wellness and healthy ageing, he urged participants to become ambassadors of the ‘Yoga 365’ campaign and spread yoga’s message worldwide.पंतप्रधानांच्या हस्ते गुजरात मधील अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन
June 04th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेमुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक मैलाचा दगड प्रस्थापित झाल्याचे मानले जात आहे. आज अहमदाबादच्या भूमीवरून जगाच्या क्रीडा वारशामध्ये एक नवीन अध्याय जोडला जात आहे, असे मोदी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.पारंपरिक औषधोपचारावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक परिषदेतील पंतप्रधानांचे संबोधन
December 19th, 08:11 pm
पारंपरिक औषधोपचार यावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक परिषदेचा आज समापन दिन आहे. गेले तीन दिवस इथे पारंपरिक औषधोपचार क्षेत्राशी संबंधित सांगोपांग आणि महत्वपूर्ण चर्चा झाली. यासंदर्भात एका मजबूत मंचासाठी भारत काम करत आहे याचा मला आनंद आहे आणि यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचीही सक्रीय भूमिका राहिली आहे. या यशस्वी आयोजनासाठी मी जागतिक आरोग्य संघटनेचे, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे आणि इथे उपस्थित सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानतो.