फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
February 10th, 12:00 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून मी 10 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे. पॅरिसमध्ये पोहोचल्यावर, मी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्र येणार आहेत. या शिखर परिषदेत आम्ही सर्वजण मिळून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाचा नवोन्मेषास तसेच व्यापक सार्वजनिक हितासाठी सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने वापर करण्यासंबंधीच्या परस्पर सहकार्याच्या दृष्टिकोनावर विचारांची देवाणघेवाण करणार आहोत.