संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

July 20th, 10:30 am

मान्सून आता आपला सकारात्मक प्रभाव दर्शवू लागत असतानाच संसदेचे पावसाळी अधिवेशन देखील सुरु होत आहे. मान्सून असो किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन जर दोन्ही गोष्टी सक्रिय असतील तर त्या अतिशय फलदायी ठरतात.आणि जेव्हा दोन्ही गोष्टी फलदायी असतात तेव्हा त्यातून राष्ट्राच्या हितासाठी आणि सर्व सजीव सृष्टीसाठी अमूल्य योगदान मिळते. या आशेसह हा मान्सून असाच सक्रिय राहो आणि पावसाळी अधिवेशन फलदायी ठरो, अशी आपण प्रार्थना करुया.

PM Modi's statement at the start of the Monsoon Session of 2026

July 20th, 10:00 am

Addressing the media ahead of the Monsoon Session of Parliament, PM Modi highlighted the remarkable milestones the country has achieved over the past month across sectors such as space, energy, semiconductors and railways. He noted that India recorded a growth rate of 7.7%, remaining the fastest-growing major economy in the world. He also emphasised the importance of Parliament functioning smoothly and holding meaningful discussions to take the country forward.

'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

December 28th, 11:30 am

2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 25th, 06:42 pm

तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण

August 25th, 06:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.

18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

August 12th, 04:34 pm

64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. शतकानुशतके, भारतीय आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ, 5 व्या शतकात, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते असे सांगणारे ते पहिलेच होते. अक्षरशः त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला!,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाडला केले संबोधित

August 12th, 04:33 pm

भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी, अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. भारतीय शतकानुशतकांपासून आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत, असे मोदी म्हणाले. त्यांनी आर्यभट्ट यांचे उदाहरण दिले, ज्यांनी 5 व्या शतकात शून्याचा शोध लावला आणि पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते असे विधान प्रथम केले. शब्दशः, त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला! असे पंतप्रधानांनी नमूद केले.

Monsoon Session is a symbol of India’s rising stature, and democratic strength: PM Modi

July 21st, 10:30 am

PM Modi has addressed the media during the commencement of the Monsoon Session of Parliament. In his remarks, he touched upon the horrific Pahalgam massacre and lauded the unified voice of India’s political leadership in exposing Pakistan’s role. The PM also noted the global recognition of Digital India, particularly UPI. He affirmed that Naxalism and Maoism are on the decline and also hailed the success of Operation Sindoor.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आरंभापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

July 21st, 09:54 am

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या या प्रास्तिविकात, त्यांनी पहलगाम येथील भीषण हत्याकांडाच्या मुद्द्याला स्पर्श करत पाकिस्तानच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतातील राजकीय नेतृत्वाने एकमुखाने आवाज उठविल्याची त्यांनी प्रशंसा केली. डिजिटल इंडिया, विशेषत: यूपीआयला जगभरात मान्यता मिळत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. नक्षलवाद आणि माओवादाचे प्रमाण कमी होत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला तसेच ऑपरेशन सिंदूरच्या यशाची प्रशंसा केली.

ऐतिहासिक अंतराळ मोहिमेवरून परतलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे पंतप्रधानांनी केले स्वागत

July 15th, 03:36 pm

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्य करण्याच्या ऐतिहासिक मोहिमेवरून पृथ्वीवर परतलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत प्रवास करणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी केलेली कामगिरी देशाच्या अंतराळ संशोधनाच्या प्रवासात एक महत्त्वाची घटना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासोबत पंतप्रधानांनी केलेल्या संवादाचे भाषांतर

June 28th, 08:24 pm

आज तुम्ही मातृभूमीपासून, भारतभूमीपासून, सर्वात दूर आहात, पण भारतीयांच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहात. तुमच्या नावातही शुभ आहे आणि तुमचा हा प्रवास एका नव्या युगाची सुरुवातही आहे. यावेळी बोलत आहोत आपण दोघे, पण माझ्यासोबत 140 कोटी भारतवासीयांच्या भावना देखील आहेत. माझ्या आवाजात सर्व भारतीयांचा उत्साह आणि आकांक्षा समाविष्ट आहेत. अंतराळात भारताचा झेंडा फडकवल्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मी जास्त वेळ घेत नाहीये, तर सर्वात आधी हे सांगा, तिथे सर्व क्षेम-कुशल आहे ना? तुमची तब्येत ठीक आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासोबत संवाद

June 28th, 08:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) जाणारे पहिले भारतीय ठरलेल्या ग्रुप कॅप्टन शुभ्रांशु शुक्ला यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की शुभांशु शुक्ला सध्या भारतीय मातृभूमीपासून सर्वात दूर असले तरी ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या सर्वाधिक समीप आहेत. शुभांशु यांच्या नावातच शुभत्व आहे आणि त्यांची ही अंतराळ यात्रा एका नव्या युगाची सुरुवात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी म्हणाले की हे दोन व्यक्तींमधील संभाषण असले तरी ते 140 कोटी भारतीयांच्या भावना आणि उत्साह व्यक्त करत आहे. शुभांशु यांच्याशी बोलणारा हा आवाज संपूर्ण देशाचा सामूहिक उत्साह आणि अभिमान घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले, आणि अवकाशात भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांनी शुभांशु यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी शुभांशु यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि अंतराळ स्थानकावर सर्व काही ठीक आहे का, याची चौकशी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत केले

June 25th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय बनण्याच्या तयारीत असलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनाही मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.