अमली पदार्थ आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश

June 26th, 11:37 am

आपल्या समाजातून अंमली पदार्थांचा धोका हद्दपार व्हावा यासाठी तळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या सर्वांची आपण प्रशंसा करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमली पदार्थ आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे. अशा प्रकारे आयुष्य वाचवण्याचा प्रत्येक प्रयत्न महत्वाचा आहे. अंमली पदार्थ आपल्याबरोबर अंधःकार आणि विनाश घेऊन येतात.