पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले
October 31st, 06:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये रोहिणी येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 ला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, आत्ताच ऐकलेल्या मंत्रांची ऊर्जा आपल्या सर्वांना अजूनही जाणवत आहे. आपण जेव्हा अशा संमेलनात येतो तेव्हा आपल्याला दैवी आणि विलक्षण अनुभव येतो, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी या भावनेचे श्रेय स्वामी दयानंद यांच्या आशीर्वादाला दिले. पंतप्रधानांनी स्वामी दयानंद यांच्या आदर्शांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व विचारवंतांबरोबरच्या अनेक दशकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आपल्याला वारंवार त्यांच्यामध्ये येण्याची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते त्यांना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि एक अनोखी प्रेरणा निर्माण होते.नवी दिल्ली येथे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय आर्यन शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार
October 29th, 10:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीमध्ये रोहिणी येथे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय आर्यन शिखर परिषदेत दुपारी पावणेतीन वाजता सहभागी होणार आहेत. ही परिषद महर्षी दयानंद सरस्वती जी यांची 200 वी जयंती आणि आर्य समाजाच्या सामाजिक सेवाकार्याची 150 वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित ज्ञानज्योती महोत्सवाचा भाग असणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांशी संवाद देखील साधतील.