सार्वजनिक-खाजगी भागीदारी द्वारे (PPP) खाजगी भागीदाराच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
May 13th, 03:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) मिहान इंडिया लिमिटेड (एमएलआय) ला भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीचा भाडेपट्टा कालावधी 06.08.2039 नंतरही वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे एमआयएलला, सवलतदार म्हणजेच जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (जीएमआयएल) व्यावसायिक संचालन सुरू झाल्याच्या तारखेपासून (सीओडी) 30 वर्षांकरिता विमानतळाचा परवाना देणे शक्य होईल.This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23rd, 08:30 pm
PM Modi addressed the TV9 Summit and emphasized that India's economy is progressing rapidly, leaving behind the pre-2014 conditions. He affirmed that India stands with its own interests, with peace and with dialogue and gave a detailed account of the country's development momentum over the last 23 days. Asserting that national interest must be placed above party interest, the PM drew inspiration from icons who always placed the nation above self.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्क शिखर परिषदेला केले संबोधित
March 23rd, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि जग' या विषयावरील टीव्ही9 शिखर परिषदेला संबोधित केले. जगातील अभूतपूर्व आणि गंभीर परिस्थितीची दखल घेत, पंतप्रधानांनी एका अत्यंत कठीण प्रसंगी विचारांच्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल टीव्ही9 नेटवर्कचे कौतुक केले.Today, Uttar Pradesh and the entire country are witnessing a new era of world-class infrastructure: PM Modi in Meerut
February 22nd, 01:30 pm
PM Modi inaugurated the Namo Bharat Rapid Rail and the Meerut Metro in Meerut, calling them a new surge of energy for a ‘Viksit Uttar Pradesh’ and a ‘Viksit Bharat’. He highlighted that the government conferred the Bharat Ratna upon Chaudhary Charan Singh ji and inspired by his vision, the double-engine government is working to increase farmers' income. He noted that a transformed Uttar Pradesh has triggered a major economic surge and manufacturing boom.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या 'नमो भारत' प्रादेशिक जलद परिवहन व्यवस्था (आर आर टी एस) चे केले उद्घाटन आणि दिल्ली-मीरत नमो भारत कॉरिडॉर राष्ट्राला केला समर्पित
February 22nd, 01:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीरत इथे 'नमो भारत रॅपिड रेल' या द्रुतगती रेल्वे सेवेचे आणि 'मीरत मेट्रो' मार्गाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचे वर्णन त्यांनी, ‘विकसित उत्तर प्रदेश’ आणि ‘विकसित भारत’ यासाठी एका नवीन ऊर्जेचा संचार असे केले. रॅपिड रेल आणि मेट्रो सेवा एकाच दिवशी एकाच फलाटावरून सुरू होण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे.संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या भारत भेटीची फलनि:ष्पत्ती
January 19th, 08:23 pm
गुजरात सरकार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या गुंतवणूक मंत्रालयादरम्यान धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक सहकार्याबाबत इरादापत्रसंयुक्त निवेदन: संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भारत भेट
January 19th, 08:10 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी 19 जानेवारी 2026 रोजी भारताला अधिकृत भेट दिली. महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची गेल्या दहा वर्षांतील ही पाचवी भेट असून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची तिसरी भेट आहे.पंतप्रधानांनी भूषवले ‘प्रगती’च्या 50 व्या बैठकीचे अध्यक्षपद
December 31st, 08:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रगती' च्या 50 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. सक्रिय सुशासन आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानावर आधारित हे बहु-स्तरीय व्यासपीठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सहकार्यात्मक आणि परिणाम-केंद्रित प्रशासनाच्या दशकाच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तंत्रज्ञानावर आधारित नेतृत्व, थेट देखरेख आणि केंद्र-राज्य यांच्यातील निरंतर सहकार्याने कशा प्रकारे राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना प्रत्यक्ष मोजता येण्याजोग्या परिणामांमध्ये रूपांतरित केले आहे, हे या टप्प्यावरून अधोरेखित होते.आसाममधील नामरूप येथील युरिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 21st, 04:25 pm
ही वीरांची भूमी आहे. सौलुंग सुकाफा, महावीर लचित बोरफुकन, भीमबर देउरी, शहीद कुसल कुवर, मोरान राजा बोडौसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंह आणि वीरांगना सती साधनी यांसारख्या महान व्यक्तींनी ही भूमी पवित्र केली आहे. अशा या वरच्या आसामच्या मातीत मी आदराने नमन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी
December 21st, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ही भूमी चाओलंग सुखाफा आणि महावीर लाचित बोरफुकन यांसारख्या महान वीरांची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. भीमबर देउरी, शहीद कुशल कुंवर, मोरान राजा बौदोसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंग आणि पराक्रमी सती साधनी यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या शौर्य आणि बलिदानाच्या महान भूमीला, उजनी आसामच्या पवित्र मातीला आपण नमन करत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.आसाममधील गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 20th, 03:20 pm
आपले भाषण सुरू करण्यापूर्वी, मी आपल्या सर्वाना एक विनंती करीत आहे, आजचा हा 'विजय दिन' केवळ आसामसाठीच नाही तर संपूर्ण ईशान्येसाठी विकासाचा उत्सव आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपले मोबाईल फोन काढावेत, फोनचा टॉर्च, फ्लॅश लाईट सुरू करावा आणि विकासाच्या या उत्सवात सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोनचा टॉर्च-फ्लॅश सुरू करावा आणि प्रचंड टाळ्यांचा गजरही करावा. संपूर्ण देशाला ऐकू आले पाहिजे आणि दिसले पाहिजे की, आसाम आता विकासाचा उत्सव साजरा करत आहे. ज्यावेळी विकासाचा प्रकाश पोहोचतो, त्यावेळी जीवनाचा प्रत्येक मार्ग नवीन उंची गाठू लागतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन
December 20th, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटनामुळे आसामधील दळणवळणीय जोडणी, अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि जागतिक सहभागातील परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला गेला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आजचा दिवस आसाम आणि ईशान्य भारताच्या विकास आणि प्रगतीचा सोहळा आहे असे ते म्हणाले. जेव्हा प्रगतीची किरणे लोकांपर्यंत पोहोचतात, त्यावेळी जीवनातील प्रत्येक मार्ग नव्या उंचीला स्पर्श करू लागतो, असे त्यांनी अधोरेखित केले. आसामच्या भूमीशी आपली नाळ घट्टपणे जोडलेली असून, इथल्या लोकांचे प्रेम आणि स्नेह, तसेच विशेषतः आसाम आणि ईशान्य भारतातील माता-भगिनींमधला जिव्हाळा आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आला आहे, त्यातूनच या क्षेत्राच्या विकासाचा सामूहिक संकल्पही मजबूत झाला आहे असे त्यांनी सांगितले. आज आसामच्या विकासात पुन्हा एकदा नवी अध्याय जोडला गेला आहे ही बाब त्यांनी नमूद केली. भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या गीतातील ओळींचा संदर्भही त्यांनी दिला. विशाल ब्रह्मपुत्रा नदीचा काठ उजळून निघेल, अंधाराची प्रत्येक भिंत तुटून पडेल आणि हाच राष्ट्राचा संकल्प आणि पवित्र प्रतिज्ञा आहे, त्यामुळे हे निश्चितपणे घडून येईल असाच त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान येत्या 20 आणि 21 डिसेंबरला आसाम दौऱ्यावर
December 19th, 02:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 आणि 21 डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पंतप्रधान गुवाहाटी येथे पोहोचतील. तेथे ते लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची पाहणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.पंतप्रधान सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे 26 नोव्हेंबर रोजी करणार उद्घाटन
November 25th, 04:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन करतील.महाराष्ट्रातील मुंबई येथे अनेक विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 08th, 03:44 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी रामदास आठवले जी, के.आर. नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, अन्य मंत्रीगण, जपानचे भारतातील राजदूत केइची ओनो आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांचे देखील केले उद्घाटन आणि लोकार्पण
October 08th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले तसेच मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करत, मोदी यांनी उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.अलिकडेच पार पडलेल्या विजयादशमी आणि कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाचा उल्लेख करत त्यांनी आगामी दिवाळी सणासाठी शुभेच्छा दिल्या.अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून आणि त्याचे “ महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम” असे नामकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
January 05th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्याच्या आणि त्याचे नामकरण “ महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम” करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.गुजरातमधील सुरत येथे सुरत हिरे बाजाराचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 17th, 12:00 pm
सुरत म्हणजे सुरत! सुरतकडे इतिहासाचा अनुभव आहे, वर्तमानाचा वेग आहे आणि भविष्याची दूरदृष्टी आहे, या सर्वांचे नाव आहे सुरत!! आणि हे सुरत माझे सुरत आहे. कोणत्याही कामामध्ये एकही कसर सोडली जात नाही, असे हे सुरत आहे. त्याच प्रमाणे सर्व गोष्टींच्या बाबतीत सुरतकरांना कितीही घाई, गडबड असली तरी, भोजन तसेच खाण्या-पिण्याच्या दुकानामध्ये जर अर्धा तास रांग लावावी लागत असेल तरीही त्यांच्या मते काही हरकत नाही, त्यांच्याकडे तितका धीर नक्कीच आहे. प्रचंड पाऊस असो आणि अगदी गुडघ्यापर्यंत पाणी भरलेले असो, परंतु पकोडे -भजीच्या दुकानामध्ये जायचं आहे म्हणजे जायचंच. शरद पौर्णिमा, चंडी पाडवा, या दिवशी जगातले सगळे लोक घराच्या गच्चीवर जातात. आणि इथं, आमचे सुरतकर रस्त्याच्या कडेला संपूर्ण कुटुंबाबरोबर घारी म्हणजे मिठाई खात असतात. आणि त्यामध्ये त्यांना आनंद इतका मिळत असतो की, हे साहेब जवळच्या कोणत्याही स्थळांना फिरायला जात नाहीत, मात्र संपूर्ण विश्वामध्ये फिरतात. मला आठवते की, 40-45 वर्षांपूर्वी सौराष्ट्रातील बंधू सुरतच्या दिशेने गेले, त्यावेळी मी सोराष्ट्रातील आमच्या जुन्या मित्रांना विचारत होतो की, तुम्ही सौराष्ट्र सोडून सुरतेमध्ये आला आहात, तर कसे वाटते? त्यावेळी ते म्हणत होते सुरतमध्ये आणि आमच्या काठियावाडमध्ये खूपच फरक आहे. ही गोष्ट मी 40-45 वर्षांपूर्वींची सांगतोय. मी विचारत होतो, काय फरक आहे? तर ते सांगत होते, काठियावाडमध्ये जर समोरा-समोर मोटारसायकलींची धडक झाली तर दोघांमध्ये तलवार बाहेर काढण्यापर्यंत वितंडवाद होत असे. मात्र सुरतमध्ये अशा प्रकारे मोटारसायकलींची धडक झाली तर, लगेच म्हणतात, असं आहे भाई, चूक तर तुझी आहे आणि माझीही चूक आहे, आता दे सोडून! इतके अंतर आहे.पंतप्रधानांनी सूरत हिरे बाजाराचे केले उद्घाटन
December 17th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे सूरत हिरे बाजाराचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांनी पंचतत्व उद्यानाला भेट दिली, सुरत हिरे बाजार आणि स्पाइन-4 च्या हरित इमारतीची पाहणी केली तसेच तेथील अभ्यागत पुस्तिकेवर स्वाक्षरी देखील केली. आदल्या दिवशी पंतप्रधानांनी सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले.केंद्रीय मंत्रिमंडळाची सूरत विमानतळ एक आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्याला मंजुरी
December 15th, 09:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, सूरत विमानतळ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.