पंतप्रधानांनी आयएनएसव्ही कौंडिण्यच्या पथकाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या

December 31st, 11:30 pm

खोल समुद्रात सध्या प्रवास करत असलेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यच्या पथकाकडून प्राप्त झालेल्या छायाचित्राबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. देश 2026 या नववर्षाचे स्वागत करण्यास सज्ज होत असताना पंतप्रधानांनी पथकाच्या उत्साहाची प्रशंसा करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन भारतीय शिवण-जहाज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या आणि पोरबंदरहून ओमानमधल्या मस्कतसाठी आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला निघालेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यची केली प्रशंसा

December 29th, 05:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या सागरी प्रवासासाठी पोरबंदरहून ओमानमधल्या मस्कतकडे निघालेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यचे तसेच या जहाजाच्या निर्मितीसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल डिझाइनर, कारागीर, जहाज निर्माते आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे. आयएनएसव्ही कौंडिण्य हे प्राचीन भारतीय शिवण-जहाज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले गेले आहे, जे भारताच्या समृद्ध सागरी परंपरा अधोरेखित करते, असे पंतप्रधान म्हणाले. आखाती प्रदेश आणि त्यापलीकडील देशांशी असलेले आपले ऐतिहासिक संबंध पुन्हा प्रस्थापित करत असलेल्या या प्रवासासाठी मी जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि अविस्मरणीय प्रवासासाठी शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.