पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

June 26th, 12:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. त्यांच्या लेखणीने भारतीयांच्या अनेक पिढ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना व सांस्कृतिक अभिमानाची अनुभूती जागृत केली, असे सांगत त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे एक महान साहित्यिक म्हणून स्मरण केले.

हजरत इमाम हुसेन यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

June 26th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजरत इमाम हुसेन (एएस) यांच्या सर्वोच्च त्यागाचे तसेच सत्य व न्यायाप्रति असलेल्या त्यांच्या अतूट वचनबद्धतेचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. इमाम हुसेन यांचे जीवन व त्यांचे बलिदान हे धैर्य आणि दृढ विश्वासाच्या सामर्थ्याची निरंतर आठवण करून देणारे आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

सामूहिक उत्साह आणि कृती राष्ट्राला समृद्ध करतात यावर भर देणारे पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित केले सामायिक

June 24th, 03:34 pm

सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांमुळे राष्ट्राची समृद्धी अक्षय राहते; यावर भर देणारे एक संस्कृत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. याच भावनेतून समाजात नवी ऊर्जा संचारते आणि विकासाचे संकल्प पूर्ण करण्याचा मार्ग ती प्रशस्त करते.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली, संस्कृत सुभाषित केले सामायिक

June 23rd, 03:39 pm

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांना आदरांजली वाहिली आणि राष्ट्र-उभारणीसाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले.

Odisha is emerging as a gateway to growth and prosperity in eastern India: PM Modi in Pahadpur

June 20th, 01:10 pm

The President, Smt. Droupadi Murmu and the Prime Minister, Shri Narendra Modi visited Pahadpur village in Mayurbhanj district today. The President and the Prime Minister offered prayers at the sacred groves Santhali Jahera and Ho Jahera, Skill Centre and Pahadpur School. The President and Prime Minister participated in a programme at Rairangpur in Mayurbhanj district, marking the completion of two years of the Government of Odisha. The theme of the programme is “Vikas ra Dhara, Odisha Sara”. Shri Modi inaugurated and laid the foundation stone of various development projects worth over ₹47,600 crore.

ओदिशा राज्य सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

June 20th, 01:00 pm

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या पवित्र उपवनांत, तसेच हो जाहेरा कौशल्य केंद्रात आणि पहाडपूर शाळेत जाऊन प्रार्थना केली. यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतला. ओदिशा राज्य सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विकास रा धारा, ओदिशा सारा अशी या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

June 20th, 08:32 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

‘पश्चिमबंगा’ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा; डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या योगदानाचे स्मरण

June 20th, 08:30 am

पश्चिमबंगा दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी सत्य, सेवा, ज्ञान आणि कृती या गुणांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित शेअर केले

June 18th, 09:23 am

सत्याच्या मागे संपत्ती येते, निस्वार्थ सेवेच्या मागे कीर्ती येते, सातत्यपूर्ण सरावाच्या मागे ज्ञान येते आणि कृतीतून शहाणपण प्राप्त होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ही मूल्ये व्यक्तीचे चारित्र्य घडवण्यात आणि सामूहिक प्रगतीमध्ये योगदान देण्यात महत्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले आहे.

आदर आणि प्रशंसा यांचं महत्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

June 17th, 09:05 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, स्नेहपूर्ण आदर आणि मान्यता मिळाल्यामुळे व्यक्तीला स्वत:चा अभिमान वाटतो आणि समाधान मिळते. यामुळे केवळ आत्मविश्वासचं वाढतो असं नाही, तर व्यक्तीमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साहही संचारतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकबुद्धी आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

June 16th, 08:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम, विवेक आणि दूरदृष्टी यांच्या आधारावर केलेल्या कृतींमुळेच सुख-समृद्धीचे मार्ग खुले होतात, असे सांगितले. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याचा सखोल विचार आणि योग्य आकलन आवश्यक असून, यशाचा पाया नेहमीच विचारपूर्वक उचललेल्या पावलांवर उभा असतो, असे त्यांनी नमूद केले.

Bharat Innovates is becoming a bridge between Indian talent and European capital: PM Modi in Nice, France

June 14th, 04:36 pm

PM Modi and French President Emmanuel Macron jointly inaugurated Bharat Innovates 2026 in Nice, France. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s deep-tech revolution and the transformative potential of AI, satellite technology, advanced manufacturing and clean energy. He called for trusted, inclusive and human-centric innovation, while reaffirming India’s vision of becoming a global innovation hub.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भारत इनोव्हेट्स 2026’ मध्ये झाले सहभागी

June 14th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्समधील नीस येथील पॅलेस डे एक्स्पोझिशन्स येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत इनोव्हेट्स हा तीन दिवसीय कार्यक्रम, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नवोन्मेष निधी आणि प्रभावासह भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संशोधक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारा मंच आहे. जागतिक स्तरावर भारताचे अग्रगण्य डीप तंत्रज्ञान प्रदर्शित करणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक महत्त्वाच्या 13 महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान स्तंभांमधील 120 पथदर्शी स्टार्टअप्स आणि 20 हून अधिक उत्कृष्ट संशोधन संस्थांच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले आहे. जगभरातील 350 हून अधिक आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

June 10th, 07:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद आपल्याला राष्ट्रसेवेसाठी अधिक कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतात, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

राष्ट्रपतींनी आपुलकीने दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले आभार

June 10th, 07:18 pm

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपुलकीने दिलेल्या शुभेच्छा तसेच त्यांनी काढलेल्या कौतुकोद्गारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे आभार व्यक्त केले. मागील काही वर्षांत जे काही यश साध्य झाले आहे, ते भारतीय जनतेच्या सामूहिक प्रयत्नांचे आणि त्यांच्या आकांक्षांचे फलित असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

Prime Minister pays tributes to Dharti Aaba Bhagwan Birsa Munda Ji on his martyrdom day

June 09th, 01:29 pm

Prime Minister Shri Narendra Modi today paid tributes to Dharti Aaba Bhagwan Birsa Munda Ji on his martyrdom day. The Prime Minister noted that he fought with indomitable courage against foreign rule for the protection of water, forest, and land.

विश्वास, विकास आणि जनकल्याणाप्रती समर्पित सरकारच्या 12 वर्षांच्या वाटचालीवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला

June 09th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की सरकारचा गेल्या 12 वर्षांचा कार्यकाळ विश्वास, विकास आणि जनकल्याणाप्रती समर्पित राहिला आहे. 140 कोटी भारतीयांचे आशीर्वाद आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना यांच्या मदतीने तरुण वर्ग, महिला तसेच शेतकरी बंधू-भगिनींना सक्षम करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली गेली नाही असे त्यांनी नमूद केले.

संयुक्त राष्ट्रांचा 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार मिळाल्याबद्दल मेजर अभिलाषा बराक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

June 07th, 02:06 pm

मेजर अभिलाषा बराक यांना 'यूएन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. मेजर बराक या लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलात (UNIFIL) एंगेजमेंट टीम कमांडर आणि जेंडर फोकल पॉइंट म्हणून कार्यरत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी उपाय सांगितले आणि नागरिकांना पुरेसे पाणी पिऊन शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.

May 31st, 11:30 am

‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी एनटीआर गारू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

May 28th, 09:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनटीआर गारू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.