
Cabinet approves construction of 4-Lane Paramakudi - Ramanathapuram Section (NH-87) in Tamilnadu worth Rs.1853 crore
July 01st, 03:13 pm
The Union Cabinet has approved the construction of 4-Lane Paramakudi - Ramanathapuram Section (46.7 km) in Tamilnadu. The project worth Rs.1,853 crore will decongest the existing corridor, improve safety, and cater to the mobility needs of the surrounding towns. It will play a pivotal role in regional economic growth, strengthening connectivity and boosting tourism.
PM chairs 48th PRAGATI meeting
June 25th, 09:11 pm
Prime Minister Shri Narendra Modi chaired the 48th meeting of PRAGATI, the ICT-enabled, multi-modal platform aimed at fostering Pro-Active Governance and Timely Implementation, by seamlessly integrating efforts of the Central and State governments, at South Block, earlier today.
Cabinet approves Pune Metro Rail Project Phase-2
June 25th, 03:08 pm
The Union Cabinet chaired by PM Modi has approved the Pune Metro Rail Project Phase-2 project worth Rs.3626.24 crore. This project will serve key IT hubs, commercial areas, educational institutions, and residential pockets, increasing the share of public transport and ridership across the network. It is poised to unlock Pune’s economic potential.पंतप्रधान 20 - 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार
June 19th, 05:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 - 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली क्रोएशिया प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांची भेट
June 18th, 11:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झाग्रेब येथे क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहिम आंद्रेज प्लेनकोविक यांची भेट घेतली. भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच क्रोएशिया भेट असल्यामुळे भारत आणि क्रोएशिया यांच्यातील संबंधांचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक बांस्की द्वोरी पॅलेस येथे आगमन होताच पंतप्रधान प्लेनकोविक यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्याआधी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झाग्रेब विमानतळावर आगमन झाले त्यावेळी विशेष बाब म्हणून पंतप्रधान प्लेनकोविक यांनी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले.जी-7 राष्ट्र समुहाच्या उर्जा सुरक्षेवरील संवाद सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद (17 जून 2025)
June 18th, 11:15 am
जी-7 शिखर परिषदेकरता आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल आणि उत्तम स्वागतासाठी मी पंतप्रधान कार्नी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. जी-7 समुहाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मी सर्व मित्रांचे मनापासून अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी जी-7 आउटरीच सत्राला केले संबोधित
June 18th, 11:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाच्या कनानास्किस येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या आऊटरीच सत्रात सहभाग घेतला.‘ऊर्जा सुरक्षितता: बदलत्या जागतिक परिस्थितीत उपलब्धता व परवडणाऱ्या दरात ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविधता,तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा’ या विषयावरील सत्राला त्यांनी संबोधित केले. दरम्यान, जी-7 च्या 50 वर्षांच्या प्रवासाबद्दलही त्यांनी अभिनंदन केले आणि आमंत्रण दिल्याबद्दल कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे आभार मानले.झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार
June 11th, 03:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 6,405 कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे:-भारतात पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्रांतीची 11 वर्षे अधोरेखित केली
June 11th, 10:17 am
गेले दशकभराहून अधिक काळ देशाला समृद्धीच्या वाटेने नेणाऱ्या 11 वर्षांतील पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्रांतीचा उत्सव साजरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकास यात्रेतील महत्त्वाचा टप्पा अधोरेखित केला आहे. सुधारित जोडणी सुविधा, आर्थिक विस्तार आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ जीवनमान तसेच वाढीव समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या रेल्वे, महामार्ग, बंदरे आणि विमानतळ अशा सर्व क्षेत्रांमधील पायाभूत सुविधा क्षेत्रात भारताने घेतलेल्या प्रचंड भरारीवर पंतप्रधान मोदी यांनी अधिक भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात सहभाग असलेल्या लोकांशी साधला संवाद
June 06th, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात सहभाग असलेल्या काही लोकांशी संवाद साधला. राष्ट्रासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याप्रति त्यांच्या अढळ वचनबद्धतेचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.गेल्या 11 वर्षात, आमच्या सरकारचे प्रत्येक पाऊल गरिबांची सेवा, सुशासन आणि कल्याणासाठी समर्पित आहेः पंतप्रधान
June 05th, 09:45 am
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारची गरीब कल्याणासाठी असलेली अतूट बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशात परिवर्तनकारी आणि सर्वसमावेशक शासनाची 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ते म्हणाले की, सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि समावेशकतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका कनवाळू सरकारने 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.Prime Minister Narendra Modi to visit Jammu and Kashmir
June 04th, 12:37 pm
PM Modi will visit Jammu and Kashmir on 6th June to inaugurate the Chenab bridge and Anji bridge. He will also launch multiple development projects worth over Rs 46,000 crore at Katra and flag off two Vande Bharat Express trains. He will lay the foundation stone of Shri Mata Vaishno Devi Institute of Medical Excellence in Katra contributing to the healthcare infrastructure in the region.नवी दिल्लीत भारत मंडपम इथे जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
June 02nd, 05:34 pm
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेत आपणा सर्व अतिथींचे मी भारतात स्वागत करतो, आपले अभिनंदन करतो. 4 दशकानंतर हा कार्यक्रम भारतात होत आहे. या 4 दशकात भारतात मोठे परिवर्तन झाले आहे. आजचा भारत पूर्वीपेक्षा अनेक पटीने आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. जागतिक हवाई परिसंस्थेत आम्ही केवळ एक मोठी बाजारपेठ नव्हे तर धोरण नेतृत्व, नवोन्मेश आणि समावेशक विकासाचे प्रतीकही आहोत. जागतिक अंतराळ-हवाई वाहतूक या एकत्रित क्षेत्रात भारत आज उगवते नेतृत्व आहे. गेल्या एका दशकातली भारताची नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातली झेप सर्व परिचित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्राला केले संबोधित
June 02nd, 05:00 pm
जागतिक दर्जाची हवाई पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आणि संपर्कव्यवस्था वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या (WATS) पूर्ण सत्राला संबोधित केले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि चार दशकांनंतर हा कार्यक्रम भारतात होत असल्याचे महत्त्व अधोरेखित केले. या काळात भारतामध्ये झालेल्या परिवर्तनीय बदलांवर त्यांनी भर दिला, आणि आजचा भारत पूर्वीपेक्षा अधिक जास्त आत्मविश्वासाने युक्त असल्याचे नमूद केले.भारत केवळ एक मोठी बाजारपेठ नसून, धोरणात्मक नेतृत्व, नवनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी हवाई वाहतुकीच्या जागतिक परिसंस्थेत भारताच्या भूमिकेला अधोरेखित केले. आज भारत अवकाश-विमान वाहतुकीच्या एकत्रिकरणामध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या दशकात नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती झाली आहे, जे सर्वांनाच ज्ञात असल्याचेही त्यांनी सांगितले.पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सिटी गॅस वितरण प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 01:30 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सुकांत मजूमदार, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, अलीपुरद्वारचे लोकप्रिय खासदार भाई मनोज तिग्गा, इतर खासदार, आमदार आणि पश्चिम बंगालच्या माझ्या आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे 1010 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी
May 29th, 01:20 pm
भारतात शहर गॅस वितरण (सीजीडी) जाळे विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सीजीडी प्रकल्पाची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांचे अलीपुरद्वारच्या ऐतिहासिक भूमीवरून अभिनंदन केले. या प्रदेशाचे समृद्ध सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. हे केवळ त्याच्या सीमांनीच नव्हे तर खोलवर रुजलेल्या परंपरा आणि संबंधांनी देखील ते परिभाषित केले आहे, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की,अलीपुरद्वारच्या सीमेपलिकडे एका बाजूला भूतान आहे, तर दुसऱ्या बाजूला आसाम आहे, जलपायगुडीच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि कूचबिहारच्या अभिमानाने या प्रदेशाचा अविभाज्य भाग जोडलेला आहे. बंगालच्या वारसा आणि एकतेमध्ये त्याची भूमिका अधोरेखित करून त्यांनी या समृद्ध भूमीला भेट देताना विशेष आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक आहे, यावर भर देत मोदी यांनी या प्रदेशात पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि गुंतवणूकीला गती देण्यासाठी केंद्र सरकार करत असलेले निरंतर प्रयत्न अधोरेखित केले.बंगालचा विकास भारताच्या भविष्याचा आधारस्तंभ आहे,असे मोदी म्हणाले. आज या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अलीपुरद्वार आणि कूचबिहारमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे 2.5 लाखांहून अधिक कुटुंबांना वाहिनीद्वारे स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर गॅस उपलब्ध होईल. मोदींनी नमूद केले की या उपक्रमामुळे एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याची चिंता दूर होईल आणि कुटुंबांना सुरक्षित गॅस पुरवठा सुनिश्चित होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती बैठकीचे झाले आयोजन
May 28th, 09:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी प्रगती संदर्भातील बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. प्रगती हे केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या सक्रिय प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणीसाठी आयसीटी-आधारित मल्टी-मोडल व्यासपीठ आहे.आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-67 वरील बडवेल-नेल्लोर महामार्गाचा बडवेल-गोपावरम गाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-16 वरील गुरुविंदापुडी पर्यंतच्या मार्गाचा चौपदरी विकास डिझाइन- बांधा-अर्थसहाय्य करा-वापरा-हस्तांतरित करा या (DBFOT) पद्धतीने करायला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
May 28th, 03:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आंध्र प्रदेश राज्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -67 वर 3653.10 कोटी रुपये खर्चाच्या 108.134 किमी लांबीच्या चौपदरी बडवेल-नेल्लोर कॉरिडॉरच्या बांधकामाचा डिझाइन- बांधा-अर्थसहाय्य करा-वापरा- हस्तांतरित करा या (DBFOT) पद्धतीने विकास करायला मान्यता दिली आहे.वित्तीय वर्ष 2025-26 साठी विद्यमान 1.5% व्याज अनुदानासह (आयएस) सुधारित व्याज अनुदान योजना (एमआयएसएस) सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
May 28th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 2025-26 या वित्तीय वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजना (एमआयएसएस) अंतर्गत व्याज अनुदान (आयएस) घटक सुरू ठेवण्यास मान्यता दिली आणि आवश्यक निधी व्यवस्थांना मान्यता दिली.भारतीय रेल्वेच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
May 28th, 03:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली.