Indian diaspora in Malaysia acts as a living bridge between the two countries: PM Modi at the community programme in Kuala Lumpur

February 07th, 03:59 pm

PM Modi participated and addressed a community programme in Malaysia. In his address, the PM lauded the Indian diaspora in Malaysia for being a living bridge between the two countries, describing the India–Malaysia relationship as IMPACT. Having already established the Thiruvalluvar Chair at the University of Malaya, the PM announced the setting up of a Thiruvalluvar Centre in Malaysia.

PM Modi addresses a community programme in Kuala Lumpur, Malaysia

February 07th, 03:15 pm

PM Modi participated and addressed a community programme in Malaysia. In his address, the PM lauded the Indian diaspora in Malaysia for being a living bridge between the two countries, describing the India–Malaysia relationship as IMPACT. Having already established the Thiruvalluvar Chair at the University of Malaya, the PM announced the setting up of a Thiruvalluvar Centre in Malaysia.

No matter how many challenges there are, we have 140 crore solutions: PM Modi in Rajya Sabha

February 05th, 05:35 pm

PM Modi replied to the Motion of Thanks on the President’s Address in the Rajya Sabha. In his address, he highlighted that the President articulated the strength of every section and expressed faith in India’s bright future. Listing the government’s achievements over the past decade, he noted that while Congress viewed people as problems, the present government sees 140 crore Indians as the solution, with a focus on achieving a developed India by 2047.

PM Modi’s reply to the Motion of Thanks on the President’s Address in Rajya Sabha

February 05th, 05:00 pm

PM Modi replied to the Motion of Thanks on the President’s Address in the Rajya Sabha. In his address, he highlighted that the President articulated the strength of every section and expressed faith in India’s bright future. Listing the government’s achievements over the past decade, he noted that while Congress viewed people as problems, the present government sees 140 crore Indians as the solution, with a focus on achieving a developed India by 2047.

This year's budget will give India's Reform Express new energy and new momentum: PM Modi

February 01st, 01:38 pm

In his remarks on Union Budget 2026, PM Modi said the budget is historic, serving as the basis for India’s high flight towards becoming a developed nation by 2047. He noted that the budget presents an ambitious roadmap to accelerate Make in India and the Atmanirbhar Bharat campaign. Reiterating FM Sitharaman’s statement that this is a budget for the Yuva Shakti, the PM congratulated her and her team for presenting a futuristic, sensitive budget.

PM Modi’s remarks on Union Budget 2026

February 01st, 01:00 pm

In his remarks on Union Budget 2026, PM Modi said the budget is historic, serving as the basis for India’s high flight towards becoming a developed nation by 2047. He noted that the budget presents an ambitious roadmap to accelerate Make in India and the Atmanirbhar Bharat campaign. Reiterating FM Sitharaman’s statement that this is a budget for the Yuva Shakti, the PM congratulated her and her team for presenting a futuristic, sensitive budget.

DMK is the biggest enemy of Tamil Nadu’s culture: PM Modi in Madhuranthakam

January 23rd, 03:15 pm

PM Modi addressed a public rally in Madhuranthakam, Tamil Nadu, where he said the people of the state had given the DMK a clear mandate twice, but the party betrayed the trust of the people. He added DMK made many promises but delivered zero results, adding that people are now calling it a CMC government, one that promotes corruption, mafia, and crime.

Tamil Nadu shows massive support for NDA at PM Modi’s Madhuranthakam rally

January 23rd, 03:00 pm

PM Modi addressed a public rally in Madhuranthakam, Tamil Nadu, where he said the people of the state had given the DMK a clear mandate twice, but the party betrayed the trust of the people. He added DMK made many promises but delivered zero results, adding that people are now calling it a CMC government, one that promotes corruption, mafia, and crime.

केरळमधील तिरुवनंतपुरम येथे विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 23rd, 11:00 am

आज, केरळच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना नवी गती मिळाली आहे. आजपासून केरळमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली आहे आणि तिरुवनंतपुरमला देशातील एक प्रमुख स्टार्ट-अप हब बनवण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. आज, केरळमधून संपूर्ण देशासाठी गरिबांच्या कल्याणाशी संबंधित एक मोठी सुरुवात देखील होत आहे. आज पंतप्रधान स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरु करण्यात आले आहे. याचा फायदा देशभरातील रस्त्यावरील विक्रेते आणि पदपथावर काम करणाऱ्यांना होईल. या सर्व विकास आणि रोजगार निर्मितीच्या योजनांसाठी मी केरळच्या जनतेचे आणि देशवासीयांचे खूप खूप अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, उद्घाटन केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवला.

January 23rd, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील तिरुवनंतपुरम येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, उद्घाटन केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केरळच्या विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांना आज नवीन गती मिळाली आहे. केरळमधील रेल्वे संपर्कव्यवस्था आता अधिक मजबूत झाली असून तिरुवनंतपुरम शहराला एका प्रमुख स्टार्टअप केंद्रामध्ये रूपांतरित करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आज केरळमधून गरिबांच्या कल्याणासाठी एक मोठी राष्ट्रव्यापी योजना सुरु करण्यात आली. पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे अनावरण करण्यात आले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याचा फायदा देशभरातील पथविक्रेते, फेरीवाले आणि पदपथांवर काम करणाऱ्यांना होईल. या विकासकामांसाठी आणि रोजगार निर्मितीच्या उपक्रमांसाठी त्यांनी केरळ मधील लोकांचे आणि देशभरातील नागरिकांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी केरळ दौ-यावर

January 22nd, 02:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2026 रोजी केरळला भेट देणार आहेत. तिरुवअनंतपुरममध्ये सकाळी 10:45 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि आरंभ करण्यात येईल. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील.

संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या भारत भेटीची फलनि:ष्‍पत्ती

January 19th, 08:23 pm

गुजरात सरकार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या गुंतवणूक मंत्रालयादरम्यान धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक सहकार्याबाबत इरादापत्र

पश्चिम बंगालमधील सिंगूर येथील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 18th, 03:30 pm

काल मी मालदामध्ये होतो आणि आज इथे हुगळीमध्ये तुमच्याशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले आहे. विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास हे उद्दीष्ट ठेवून केंद्र सरकार सातत्यान काम करत आहे. कालचा आणि आजचा कार्यक्रम हाच निर्धार बळकट करणारे आहेत. या दोन दिवसांत पश्चिम बंगालमधील करोडो रुपयांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. देशातली पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे काल पश्चिम बंगालमधून सुरू झाली. बंगालमध्ये जवळपास अर्धा डझन नवीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत आणि आज आणखी तीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या. यातील एका रेल्वेमुळे काशी वाराणसी या माझ्या मतदारसंघाची पश्चिम बंगालसोबतची संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. शिवाय, दिल्ली आणि तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील रेल्वे वाहतुकीसाठी हे दोन दिवस अभूतपूर्व असेच म्हणावे लागतील. गेल्या 100 वर्षांत 24 तासांत इतके काम कदाचित कधीच झाले नसेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि पहिल्या शयनयान वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

January 18th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. याप्रसंगी जनसभेला संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, काल ते मालदामध्ये होते आणि आज त्यांना हुगळीतील लोकांमध्ये उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. त्यांनी अधोरेखित केले की विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास आवश्यक आहे आणि या ध्येयाने केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे. काल आणि आजचे कार्यक्रम या संकल्पाला बळ देतात, असे त्यांनी सांगितले. या काळात पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित शेकडो कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

आसाममधील काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 18th, 11:30 am

हवामान थंड आहे, गावे दूर-दूर आहेत, तरीही जिथपर्यंत माझी नजर जाते तिथे लोकच लोक दिसत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आज पुन्हा काझीरंगाला येण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. साहजिकच माझ्या मागील भेटीच्या आठवणी मनात येत आहेत. दोन वर्षांपूर्वी काझीरंगामध्ये घालवलेले क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय खास अनुभवांपैकी आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात मला रात्रभर मुक्काम करण्याची संधी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी हत्ती सफारीदरम्यान या परिसराचे सौंदर्य मी अगदी जवळून अनुभवले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कालियाबोर येथील रू 6950 कोटी रुपयांच्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचे भूमीपूजन केले

January 18th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील कालियाबोर येथील रू 6950 कोटी रुपयांच्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचे(राष्ट्रीय महामार्ग 715 च्या कालियाबोर- नूमालीगढ टप्प्याचे चौपदरीकरण) भूमी पूजन केले. यावेळी त्याना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. काझीरंगाला आपण दुसऱ्यांदा भेट दिली असून 2 वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीतील अनेक प्रसंग त्यांच्या स्मरणात कायम कोरले गेले आहेत असे त्यांनी म्हटले. काझीरंगा मध्ये रात्री मुक्काम करण्याची संधी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हत्तीवरून केलेल्या सफरीत त्यांना जवळून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता आला होता याचा त्यांनी उल्लेख केला.

आसाममधील गुवाहाटी इथे बोडो पारंपरिक संस्‍कृतिक बगुरूम्‍बा दोहो कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 17th, 06:30 pm

आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, केंद्रातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल, पवित्रा मार्गारीटा, आसाम विधानसभेचे अध्यक्ष विश्वजित दोईमारी, बोडोभूमी प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य हाग्रामा मोहिलारी, राज्य सरकारचे मंत्री, सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू-भगिनी आणि आसामच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,

Prime Minister Shri Narendra Modi addresses the Bagurumba Dwhou program in Guwahati, Assam

January 17th, 06:00 pm

PM Modi addressed the Bagurumba Dwhou 2026, a historic cultural event celebrating the rich heritage of the Bodo community, in Guwahati. In his speech, the PM highlighted that under their government, Assamese culture is being given prominence. He noted that the 2020 Bodo Peace Accord brought an end to decades of conflict, enabling youth to join the mainstream. He also listed various works done by the governments at the Centre and state for the progress of Assam and Bodoland.

पश्चिम बंगालमधील मालदा येथील विविध रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

January 17th, 02:00 pm

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस जी; केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, शांतनू ठाकूर जी, सुकांत मजुमदार जी; पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी जी; संसदेतील माझे सहकारी शामिक भट्टाचार्य जी, खगेन मुर्मू जी, कार्तिक चंद्र पॉल जी; उपस्थित सर्व मान्यवर, महिला आणि सज्जनहो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 3,250 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली

January 17th, 01:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 3,250 कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. याचा उद्देश पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील प्रदेशातील संचारसंपर्क मजबूत करणे तसेच विकासाला गती देणे हा आहे. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, आज मालदा येथून पश्चिम बंगालच्या प्रगतीला गती देण्याच्या मोहिमेला आणखी वेग आला आहे. त्यांनी अधोरेखित केले की, पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे नुकतेच उद्घाटन करून ते राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की, पश्चिम बंगालसाठी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. हे प्रकल्प लोकांचा प्रवास सुलभ करतील, तसेच व्यापार आणि वाणिज्य सुलभ करतील. त्यांनी यावर जोर दिला की, येथे स्थापन करण्यात आलेल्या नवीन रेल्वे देखभाल सुविधांमुळे बंगालच्या तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील.