श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

April 05th, 10:59 pm

श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी (आयओटी ) आज कोलंबो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. श्रीलंका सरकारच्या सहकार्याने आयओटीसाठी 10,000 घरे, आरोग्य सुविधा, पवित्र स्थळ सीता एलिया मंदिर आणि इतर समुदाय विकास प्रकल्पांच्या बांधकामाला भारत सहयोग देईल अशी घोषणा मोदी यांनी केली.