दिल्लीतील राय पिथौरा सांस्कृतिक संकुलामधील पिप्रहवा अवशेषांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी असे पंतप्रधानांचे आवाहन
January 02nd, 06:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला राय पिथौरा सांस्कृतिक संकुलामधील ‘पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या’ भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. ‘द लाईट अँड द लोटस :रेलिक्स ऑफ द अवेकन वन (प्रकाश आणि कमळ : प्रबुद्धाचे अवशेष)’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे.पंतप्रधानांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार
January 01st, 05:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. द लाइट अँड द लोटस: रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन या संकल्पनीय शीर्षकाअंतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.