भारतीय खेळाडूंच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीविषयी पंतप्रधानांकडून अभिमानाची भावना व्यक्त

August 03rd, 09:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लास्गो इथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय क्रीडापटूंच्या कामगिरीविषयी अभिमान व्यक्त केला आहे.

Prime Minister extends best wishes to the Indian contingent for the Commonwealth Games Glasgow 2026

July 24th, 12:00 pm

Prime Minister Shri Narendra Modi today extended his best wishes to the Indian contingent as the Commonwealth Games Glasgow 2026 begin.

56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय पथकाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

July 13th, 01:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलंबियातल्या बुकारामांगा इथे आयोजित 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय पथकाचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत कनिष्क जैन, रिद्धेश अनंत बेंडाळे, ऋषित गर्ग, श्रेष्ठ सुरैया आणि स्वरित जोशी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय पॅरा-ॲथलीट खेळाडूंच्या चमूचे कौतुक

October 06th, 04:28 pm

नवी दिल्ली इथे आयोजित जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पॅरा-ॲथलीट खेळाडूंच्या चमूचे कौतुक केले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 6 सुवर्ण पदकांसह 22 पदके जिंकून, या स्पर्धेच्या पदकतालिकेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीने देशाच्या पॅरा-क्रीडा प्रवासातील एक नवीन टप्पा गाठला गेला आहे. भारताने पहिल्यांदाच या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांनी 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल केले अभिनंदन

June 02nd, 03:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.प्रत्येक खेळाडूची मेहनत आणि चिकाटी संपूर्ण स्पर्धेदरम्यान स्पष्टपणे दिसून आली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सेपक टकरॉ विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पुरुष रिगू संघानचे अभिनंदन

March 26th, 03:59 pm

सेपक टकरॉ विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारतीय संघाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारताला या स्पर्धेचे पहिले वहीले सुवर्णपदक जिंकून दिल्याबद्दलही त्यांनी संघाचे कौतुक केले.

पंतप्रधानांनी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये 33 पदके जिंकणाऱ्या भारतीय पथकाचे केले अभिनंदन

March 18th, 02:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केले आहे. ट्युरिन,इटली येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय पथकाने 33 पदकांची घवघवीत कमाई करून देशाचा नावलौकिक वाढवला आहे.

पंतप्रधानांनी 10 व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय चमूचे केले अभिनंदन

December 10th, 08:19 pm

क्वालालंपूर इथे झालेल्या 10 व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.