पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोमनाथ येथे वायुसेनेच्या 'सूर्यकिरण' पथकाची थरारक प्रात्यक्षिक
May 11th, 04:13 pm
सोमनाथ अमृत महोत्सवाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय वायुसेनेच्या 'सूर्यकिरण' (Suryakiran Aerobatic Team) या चित्तथरारक हवाई कसरतींच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला.Joint Statement on Enhanced Comprehensive Strategic Partnership between the Republic of India and the Socialist Republic of Vietnam
May 06th, 05:24 pm
At the invitation of Prime Minister of India, H.E. Shri Narendra Modi, the General Secretary of Central Committee of Communist Party of Viet Nam, President of the Socialist Republic of Viet Nam, H.E. Mr. To Lam, paid a State Visit to India from 05 May to 07 May 2026. General Secretary, President H.E. Mr. To Lam was accompanied by a high-level delegation. A strong business delegation also accompanied the dignitary.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये देशवासियांना डिजिटल जनगणना 2027 मध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले.
April 26th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' भागात, पंतप्रधान मोदींनी अणू आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण, 'बीटिंग रिट्रीट' सोहळा, निसर्ग संवर्धन, बांबू क्षेत्र, प्राचीन ग्रंथ आणि 'गणितीय ऑलिम्पियाड कार्यक्रम' यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या मोहिमेबद्दलही माहिती दिली आणि सर्वांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ च्या मोठ्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
February 24th, 04:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांविषयक मंत्रिमंडळ समितीने आज श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ च्या विस्तार - विकासाला मान्यता दिली. या कार्यासाठी सुमारे खर्च 1,677 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काश्मीर खोऱ्यात हवाई वाहतुकीची पायाभूत सुविधा आणि संपर्क यंत्रणा मजबूत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. या प्रकल्पात सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी बॅरेक्स बांधण्याचाही समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) बडगाम हवाई तळाअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे या विमानतळाचे कार्यान्वयन केले जाते. वर्ष 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून सुविधा उपलब्ध करून दिलेले हे विमानतळ, श्रीनगर शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे.पंतप्रधानांनी बीटिंग रिट्रीट 2026 मधील क्षणचित्रे केली सामायिक
January 29th, 04:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीटिंग रिट्रीट 2026 मधील क्षणचित्रे सामायिक केली. विविध वाद्यवृंदांचे सादरीकरण संस्मरणीय होते, असे त्यांनी म्हटले आहे.In pictures: 77th Republic Day at Kartavya Path, New Delhi
January 26th, 08:12 am
The 77th Republic Day celebrations at Kartavya Path showcased India’s unity, strength and heritage. Prime Minister Narendra Modi began the day by paying homage to the martyrs at the Rashtriya Samar Smarak and reaffirmed the nation’s gratitude to its bravehearts.आयएनएस विक्रांतवर साजऱ्या केलेल्या दिवाळी क्षणांची झलक पंतप्रधानांकडून सामाईक
October 21st, 09:30 am
भारतीय नौदलासमवेत आयएनएस विक्रांतवर साजऱ्या केलेल्या दिवाळी क्षणांची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केली. मोदींनी, एका बाजूला विशाल महासागर आणि दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट ताकद असल्याचे अधोरेखित करत हा दिवस, एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आणि उल्लेखनीय दृश्य असल्याचे नमूद केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तीचे प्रतीक असलेली आयएनएस विक्रांतची प्रचंड ताकद असल्याचं त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाचे किरण दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी प्रज्वलित केलेल्या दिव्यांशी मेळ राखत आहेत, जणू दिव्यांची दिव्य माळच तयार होते आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. भारतीय नौदलातील शूर जवानांसमवेत दिवाळी साजरी करणे हा त्यांना मिळालेला मान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.आयएनएस विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 20th, 10:30 am
आजचा हा दिवस अद्भुत आहे, आजचा हा क्षण संस्मरणीय आहे, हे दृश्य अद्भुत आहे. आज माझ्या एका बाजूला अथांग समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या वीर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. आज माझ्या एका बाजूला अनंत क्षितिज आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तींना सामावून घेणारे हे विशाल, विराट आयएनएस विक्रांत आहे. सागराच्या पाण्यावर सूर्याच्या किरणांची ही चमक एका प्रकारे वीर जवानांनी उजळवलेले दिवाळीचे दिवे आहेत. या आमच्या अलौकिक दीपमाळा आहेत, यावेळी नौदलाच्या तुम्हा सर्व शूर सैनिकांमध्ये मी दिवाळीचे पवित्र पर्व साजरे करत आहे हे माझे भाग्य आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रांतवर साजरी केली दिवाळी
October 20th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना सशस्त्र दलाच्या जवानांना संबोधित केले. आजचा दिवस म्हणजे एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आहे आणि समोर एक उल्लेखनीय दृश्य आहे असे नमूद करून, मोदी यांनी एका बाजूला विशाल महासागर आणि दुसरीकडे भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट शक्ती असल्याचे अधोरेखित केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे, तर दुसऱ्या बाजूला आयएनएस विक्रांतची प्रचंड शक्ती आहे, जी अनंत शक्तीचे मूर्त रूप आहे, असे त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाची चमक दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी लावलेल्या दिव्यांशी मिळती जुळती आहे, त्यामुळे दिव्यांची दिव्य माला तयार होते असं ते म्हणाले. भारतीय नौदलाच्या शूर जवानांमध्ये ही दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणे हा आपला बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल दिनानिमित्त सर्व हवाई योद्ध्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा
October 08th, 09:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल दिनानिमित्त सर्व शूर हवाई योद्धे आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांचा शुभांशू शुक्ला यांच्यासोबतचा संवाद
August 19th, 09:43 am
तर तुम्हाला काही बदल जाणवत असतील, तुम्ही लोक कुठल्या प्रकारच्या अनुभवातून जाता, ते मी समजू इच्छितो.पंतप्रधानांनी अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी साधला संवाद
August 19th, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ नवी दिल्ली येथे अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी संवाद साधला. अंतराळ प्रवासाच्या परिवर्तनकारी अनुभवाबाबत मत व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की असा महत्त्वाचा प्रवास केल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीला बदल जाणवतच असेल. आणि अंतराळवीरांना हे परिवर्तन कसे वाटते आणि ते या परिवर्तनाचा कसा अनुभव घेतात हे समजून घ्यायला मला आवडेल. पंतप्रधानांच्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करत शुभांशु शुक्ला म्हणाले की अंतराळातील वातावरण अत्यंत वेगळ्या प्रकारचे असून, गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभाव हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती
August 05th, 04:31 pm
भारत आणि फिलिपिन्स दरम्यान धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणाआदमपूर हवाई तळावर पंतप्रधानांनी शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी साधलेला संवाद
May 13th, 03:45 pm
या जयघोषाचे सामर्थ्य नुकतेच जगाने पाहिले आहे. भारत माता की जय हा केवळ जयघोष नव्हे तर भारत मातेची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या देशाच्या प्रत्येक सैनिकाची ही शपथ आहे.देशासाठी काही करू इच्छिणाऱ्या, देशहितासाठी जगणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा आवाज आहे. भारता माता की जय हा जयजयकार मैदानातही घुमतो आणि मोहिमांमधेही. भारतीय सैनिक जेव्हा भारत मातेचा जयजयकार करतात तेव्हा शत्रूचाही थरकाप उडतो.जेव्हा आपली ड्रोन्स, शत्रूची तटबंदी ढासळवतात, जेव्हा सणसणत जाणारी आपली क्षेपणास्त्रे अचूक लक्ष्यभेद करतात तेव्हा शत्रूला ऐकू येतो भारत मातेचा जयजयकार ! जेव्हा रात्रीच्या अंधारातही आम्ही सूर्याप्रमाणे लखलखीत उजेड करणारी कामगिरी करतो तेव्हा शत्रूसमोर तरळतो भारत मातेचा जयजयकार. शत्रूची अण्वस्त्रांची धमकी जेव्हा आपली सैन्यदले पोकळ ठरवितात तेव्हा आकाशापासून पाताळापर्यंत एकच जयजयकार दुमदुमतो-भारत माता की जय!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी साधला संवाद
May 13th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळाला भेट दिली आणि या तळावरील शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी संवाद साधला.त्यांना संबोधित करताना, त्यांनी 'भारत माता की जय' या जयघोषाचे सामर्थ्य अधोरेखित केले. जगाने नुकतेच याचे सामर्थ्य अनुभवले आहे यावर त्यांनी भर दिला. हा केवळ जयजयकार नसून, भारतमातेची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या प्रत्येक सैनिकाची ही एक पवित्र शपथ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही घोषणा म्हणजे, राष्ट्रहितासाठी जगण्याची आणि अर्थपूर्ण योगदान देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.‘भारत माता की जय’ हा जयघोष युद्धभूमी आणि महत्त्वाच्या मोहिमा अशा दोन्ही ठिकाणी घुमतो, असे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की जेव्हा भारतीय सैनिक ‘भारत माता की जय’ चा जयघोष करतात, तेव्हा शत्रूच्या मनात धडकी भरते. त्यांनी भारताच्या लष्करी सामर्थ्यावर भर दिला आणि सांगितले की जेव्हा भारतीय ड्रोन शत्रूच्या तटबंदी उद्ध्वस्त करतात आणि क्षेपणास्त्रे अचूकतेने हल्ला करतात, तेव्हा शत्रूला फक्त एकच वाक्य ऐकू येते—‘भारत माता की जय’. पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की अंधाऱ्या रात्रीतही, भारताकडे आकाश उजळून टाकण्याची क्षमता आहे, ज्यामुळे शत्रूला देशाच्या अदम्य भावनेचे दर्शन घडते. त्यांनी सांगितले की ज्यावेळी भारताचे सैन्य अणुबॉम्बच्या धमक्या मोडून काढते, तेव्हा आकाशात आणि पाताळात एकच संदेश घुमतो—‘भारत माता की जय’!पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनाचा मराठी अनुवाद
May 12th, 08:48 pm
आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि त्याचा संयम दोन्ही पाहिलं आहे. मी सर्वप्रथम भारताच्या पराक्रमी सैन्यदलांना, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तहेर संस्थांना, आपल्या वैज्ञानिकांना प्रत्येक भारतीयाच्या वतीनं सॅल्यूट करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्यप्राप्तीसाठी असीम शौर्य गाजवलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले राष्ट्राला संबोधित
May 12th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. अलीकडच्या काही दिवसात देशाने भारताचे सामर्थ्य आणि प्रतिरोधकता या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतला, असे ते आपल्या संबोधनात म्हणाले.बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील खास क्षण, ज्यामध्ये सशस्त्र दलांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अनोख्या पद्धतीने केला सन्मान: पंतप्रधान
January 30th, 07:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सशस्त्र दलांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला.बीटिंग रिट्रीट सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती
January 29th, 10:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीटिंग रिट्रीट सोहळ्याला हजेरी लावली.The BJP government in Gujarat has prioritised water from the very beginning: PM Modi in Amreli
October 28th, 04:00 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.