सार्वजनिक-खाजगी भागीदारी द्वारे (PPP) खाजगी भागीदाराच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

May 13th, 03:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) मिहान इंडिया लिमिटेड (एमएलआय) ला भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीचा भाडेपट्टा कालावधी 06.08.2039 नंतरही वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे एमआयएलला, सवलतदार म्हणजेच जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (जीएमआयएल) व्यावसायिक संचालन सुरू झाल्याच्या तारखेपासून (सीओडी) 30 वर्षांकरिता विमानतळाचा परवाना देणे शक्य होईल.

ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक नवोन्मेष योजनांना बळकटी देण्यासाठी मंत्रिमंडळाची महत्त्वाकांक्षी इंडिया एआय अभियानाला मंजुरी

March 07th, 08:40 pm

मेकिंग एआय इन इंडिया व मेकिंग एआय वर्क फॉर इंडिया अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला आणि योग्य वापराला देशात प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय पातळीवर सर्वसमावेशी इंडिया एआय मिशन अर्थात अभियानाला रु. 10,371.92 कोटींच्या अपेक्षित खर्चासह मंजुरी दिली.