भारत – ब्रिटन व्हिजन 2035

July 24th, 07:12 pm

भारत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांनी 24 जुलै 2025 रोजी लंडन इथे झालेल्या बैठकीदरम्यान नव्या ‘भारत-ब्रिटन व्हिजन 2035’ ला मान्यता दिली. नवी उर्जा लाभलेल्या भागीदारीच्या संपूर्ण संधी प्राप्त करण्याच्या सामायिक कटिबद्धतेची यातून पुष्टी होते. झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक स्थितीच्या काळात परस्पर विकास, समृद्धी त्याचबरोबर समृद्ध, सुरक्षित आणि शाश्वत जगताला आकार देण्यासाठी एकत्र काम करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार या महत्वाकांक्षी आणि भविष्यवेधी करारातून प्रतीत होतो.