युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल ऍन्डी बर्नहॅम यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 21st, 08:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऍन्डी बर्नहॅम यांचे युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसेच सामाजिक सुरक्षा करार याबाबतचा लेख सामायिक केला
July 15th, 12:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' (सीईटीए ) आणि 'सामाजिक सुरक्षा करार' यांवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला. हा करार भारत-ब्रिटन भागीदारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की, हे दोन करार भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करतील तसेच दोन्ही देशांच्या सामायिक आकांक्षांचे रूपांतर तेथील जनतेसाठी ठोस संधींमध्ये करतील.मेघनाद देसाई यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
July 29th, 10:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक आणि अर्थतज्ञ मेघनाद देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.