भारत आणि युकेच्या पंतप्रधानांचा भारत तसेच युकेच्या उद्योगपतींशी संवाद
July 24th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांनी आज भारत आणि युकेच्या आघाडीच्या उद्योगपतीं ची भेट घेतली. दोन्ही देशांनी ऐतिहासिक अशा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करारावर (CETA) स्वाक्षरी केल्यानंतर ही भेट झाली. आरोग्य, औषधनिर्माण, मौल्यवान रत्ने व दागिने, वाहन, उर्जा, उत्पादन, दूरसंवाद, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टीक्स, वस्त्रोद्योग आणि वित्तीय सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या क्षेत्रांचे दोन्ही देशामधील रोजगार निर्मिती आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासातील योगदान उल्लेखनीय आहे.भारत – ब्रिटन व्हिजन 2035
July 24th, 07:12 pm
भारत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांनी 24 जुलै 2025 रोजी लंडन इथे झालेल्या बैठकीदरम्यान नव्या ‘भारत-ब्रिटन व्हिजन 2035’ ला मान्यता दिली. नवी उर्जा लाभलेल्या भागीदारीच्या संपूर्ण संधी प्राप्त करण्याच्या सामायिक कटिबद्धतेची यातून पुष्टी होते. झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक स्थितीच्या काळात परस्पर विकास, समृद्धी त्याचबरोबर समृद्ध, सुरक्षित आणि शाश्वत जगताला आकार देण्यासाठी एकत्र काम करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार या महत्वाकांक्षी आणि भविष्यवेधी करारातून प्रतीत होतो.युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
July 24th, 04:20 pm
सर्वप्रथम, मी पंतप्रधान स्टार्मर यांचे त्यांच्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मनापासून आभार मानू इच्छितो. आजचा दिवस दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आज दोन्ही देशांमध्ये व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झाला आहे याचा मला आनंद आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
July 24th, 04:00 pm
आपण मनापासून केलेल्या स्वागतासाठी आणि भव्य सत्कारासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. आज आपण चेकर्समध्ये इतिहास घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहोत. भारत आणि ग्रेट ब्रिटन मिळून नव्या अध्यायाची सुरुवात करीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांची घेतली भेट
July 24th, 03:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 आणि 24 जुलै 2025 या कालावधीत युनायटेड किंग्डमच्या आपल्या अधिकृत भेटीदरम्यान, आज युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची भेट घेतली. बकिंगहॅमशायरमधील चेकर्स येथील युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर पंतप्रधान स्टार्मर यांनी मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली तसेच शिष्टमंडळ स्तरावरील चर्चाही झाली.PM Modi arrives in London, United Kingdom
July 24th, 12:15 pm
Prime Minister Narendra Modi arrived in United Kingdom a short while ago. In United Kingdom, PM Modi will hold discussions with UK PM Starmer on India-UK bilateral relations and will also review the progress of the Comprehensive Strategic Partnership.पंतप्रधानांची युनायटेड किंगडम आणि मालदीव भेट (23 – 26 जुलै 2025)
July 20th, 10:49 pm
पंतप्रधान मोदी 23 - 26 जुलै दरम्यान UK ला अधिकृत भेट देणार असून मालदीवचा सरकारचे निमंत्रित अतिथी म्हणून दौरा करणार आहेत. ते पंतप्रधान स्टार्मर यांच्याशी विस्तृत चर्चा करतील तसेच CSP च्या प्रगतीचा आढावा देखील घेतील. 26 जुलै रोजी मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्य वर्धापन दिन सोहळ्याचे पंतप्रधान मोदी 'सन्माननीय अतिथी' असतील. ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांची भेट घेणार असून त्यांच्यात परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.