जी-7 शिखर परिषदे निमित्त पंतप्रधानांनी घेतली संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांची भेट

June 17th, 12:38 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियन इथे आयोजित, जी-7 शिखर परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. 2026 या वर्षभरातील, उभय नेत्यांची ही तिसरी भेट होती. ही भेट भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दृढ आणि गतिमान 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'चं प्रतीक आहे.

परिणामांची यादी: पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती दौरा

May 15th, 03:46 pm

पंतप्रधान मोदींच्या युएई च्या अधिकृत दौऱ्यादरम्यान अनेक सामंजस्य करार आणि करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये पेट्रोलियम, तेल, संरक्षण, जहाजांची दुरुस्ती, सागरी सहकार्य आणि महासंगणक (सुपरकंप्युटिंग) यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. एका मोठ्या घोषणेनुसार, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) आणि भारताचा एनआयआयएफ हे भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात 1 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंतच्या गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत.

पंतप्रधान मोदींचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आगमन

May 15th, 01:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी येथे आगमन झाले. युएईचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले.

संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या भारत भेटीची फलनि:ष्‍पत्ती

January 19th, 08:23 pm

गुजरात सरकार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या गुंतवणूक मंत्रालयादरम्यान धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक सहकार्याबाबत इरादापत्र

संयुक्त निवेदन: संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भारत भेट

January 19th, 08:10 pm

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी 19 जानेवारी 2026 रोजी भारताला अधिकृत भेट दिली. महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची गेल्या दहा वर्षांतील ही पाचवी भेट असून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची तिसरी भेट आहे.

पंतप्रधानांनी यूएईचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे केले स्वागत

January 19th, 05:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली विमानतळावर यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत केले.

पंतप्रधान मोदी आणि यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्याकडून व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी

July 31st, 12:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अबुधाबीच्या युवराजांचे स्वागत

September 09th, 08:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे स्वागत केले. उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली.