पंतप्रधानांनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आइसलँडच्या पंतप्रधानांची भेट घेतली

May 19th, 06:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, ओस्लो येथे आइसलँडच्या पंतप्रधान क्रिस्टर्न फ्रॉस्टडॉटिर यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.

नॉर्वे-भारत व्यापार आणि संशोधन शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 18th, 11:49 pm

नॉर्वे आणि भारताच्या व्यावसायिक आणि संशोधन समुदायांच्या दरम्यान आज येथे उपस्थित राहता मला अतिशय आनंद होत आहे. मला काही सहभागींचे म्हणणे ऐकण्याची संधी मिळाली, आणि त्यांचे विचार ऐकून आपल्या भागीदारीचा पाया अत्यंत मजबूत असल्याचा आत्मविश्वास मला मिळाला आहे.

भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान झाले सहभागी

May 18th, 08:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओस्लो येथे भारत-नॉर्वे व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेत सहभागी झाले. या शिखर परिषदेत महामहीम युवराज हाकोन आणि नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर देखील सहभागी झाले.

लिकटेंस्टाईनच्या संस्थानचे वंशपरंपरागत राजकुमार एचएसएच प्रिन्स अलोइस यांचा भारत दौरा

February 20th, 03:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, लिकटेंस्टाईनचे वंशपरंपरागत राजकुमार एचएसएच प्रिन्स अलोइस यांनी नवी दिल्ली येथे आयोजित एआय इम्पॅक्ट समिट, 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताला भेट दिली.