पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया दौऱ्याच्या समारोपाबाबत संयुक्त निवेदन

April 23rd, 12:44 pm

सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांच्या निमंत्रणावरून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली.

करारांची सूची : पंतप्रधानांचा सौदी अरेबियाचा अधिकृत दौरा

April 23rd, 02:25 am

22 एप्रिल 2025 रोजी जेद्दाह येथे भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या (एसपीसी) नेत्यांची दुसरी बैठक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम मोहम्मद बिन सलमान यांच्या सह-अध्यक्षतेखाली झाली. परिषदेने एसपीसी अंतर्गत विविध समित्या, उपसमित्या आणि कार्यकारी गटांच्या कामाचा आढावा घेतला, ज्यामध्ये राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यांचा समावेश आहे. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी इतिवृत्तांवर स्वाक्षरी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे महामहिम युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची घेतली भेट; तसेच भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेचे भूषवले सह-अध्यक्षपद

April 23rd, 02:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 एप्रिल , 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली. सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम मोहम्मद बिन सलमान यांनी जेद्दाह येथील रॉयल पॅलेसमध्ये पंतप्रधानांचे समारंभपूर्वक स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाला प्रस्थान करण्यापूर्वी केलेले निवेदन

April 22nd, 08:30 am

मी आज, सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान, महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर जात आहे.

पंतप्रधान मोदी 22 आणि 23 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट देणार

April 19th, 01:55 pm

रॉयल हायनेस प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या भेटीमुळे उभय देशांदरम्यानची बहुआयामी भागीदारी अधिक दृढ आणि बळकट करण्याची तसेच परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करण्याची संधी मिळेल.