भारत-पोलंड धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीसाठीची कृती योजना (2024-2028)
August 22nd, 08:22 pm
वॉर्सॉ येथे दिनांक 22 ऑगस्ट, 2024 रोजी भारत आणि पोलंड च्या पंतप्रधानांनी केलेल्या चर्चेतून गाठलेल्या सहमतीच्या आधारावर आणि धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेतून निर्माण झालेल्या द्विपक्षीय सहकार्याच्या गतीला मान्यता देऊन प्राधान्यक्रम म्हणून खालील क्षेत्रांमध्ये 2024-2028 या काळात द्विपक्षीय सहकार्याला दिशा देणारी पंचवार्षिक कृतीयोजना तयार करण्यास दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संमती दिली:भारत-पोलंड संयुक्त निवेदन "धोरणात्मक भागिदारीची स्थापना”
August 22nd, 08:21 pm
पोलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान माननीय श्री डोनाल्ड टस्क यांच्या निमंत्रणावरून, भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 21-22 ऑगस्ट 2024 या कालावधीत पोलंडला औपचारिक भेट दिली. दोन्ही राष्ट्रे आपल्या राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत असताना ही ऐतिहासिक भेट झाली.पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी दिलेले निवेदन
August 22nd, 03:00 pm
वॉर्सासारख्या सुंदर शहरामध्ये अतिशय उत्साहात केलेले स्वागत, भव्य आदरातिथ्य, सत्कार आणि मित्रत्वाच्या नात्याने भारलेले शब्द, यासाठी मी पंतप्रधान टस्क यांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतो.