भारत ओमान मंचाला पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मराठी अनुवाद
December 18th, 04:08 pm
या व्यवसाय शिखर परिषदेसाठीचा तुमचा उत्साह माझाही उत्साह वाढवत आहे. आजची ही शिखर परिषद भारत-ओमान भागीदारीला नवीन दिशा देईल, नवीन गती देईल आणि नवीन उंची गाठून देण्यासाठी मदत करेल. आणि यात तुम्हा सर्वांची मोठी भूमिका आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत ओमान व्यवसाय मंचात झाले सहभागी
December 18th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे भारत-ओमान व्यवसाय मंचाला संबोधित केले.ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस अल युसुफ; ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष शेख फैसल अल रवास; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल; आणि सीआयआयचे अध्यक्ष राजीव मेमानी या बैठकीला उपस्थित होते. ऊर्जा, शेती, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा, उत्पादन, आरोग्य, वित्तीय सेवा, हरित विकास, शिक्षण आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांतील दोन्ही देशांतील अग्रगण्य उद्योग प्रतिनिधींनी या फोरममध्ये सहभाग घेतला.