पंतप्रधानांनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आइसलँडच्या पंतप्रधानांची भेट घेतली

May 19th, 06:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, ओस्लो येथे आइसलँडच्या पंतप्रधान क्रिस्टर्न फ्रॉस्टडॉटिर यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.

तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडच्या पंतप्रधानांसोबत बैठक

May 19th, 06:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. 19 मे 2026 रोजी ओस्लो इथे आयोजित तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर फिनलंडचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने दाखल झालेल्या डेन्मार्कच्या हंगामी पंतप्रधानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

May 19th, 06:40 pm

यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि सामायिक कृतीक्रमाच्या संदर्भात झालेल्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. पर्यावरण आणि हवामानबदलाच्या क्षेत्रांत सहयोगाला प्राधान्य देणाऱ्या भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीत झालेल्या प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये हरित व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी संसाधनांचे एकत्रीकरण करण्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. 2020 मध्ये हरित धोरणात्मक भागीदारीचा प्रारंभ झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये नियमितपणे झालेल्या उच्चस्तरीय आदान-प्रदानाची उजळणी करत दोन्ही नेत्यांनी येथून पुढे नवीन आणि उगवत्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तसेच संदेशवहन, प्रगत संशोधन, स्टार्टअप आणि शैक्षणिक आदान-प्रदान यांच्या बाबतीत सहयोग अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत सहकार्य करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. गुजरातमध्ये जीआयएफटी शहरात व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधानांनी डेन्मार्कच्या कंपन्यांना निमंत्रणही दिले.

तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतील संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन

May 19th, 04:25 pm

लोकशाही, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीयतेप्रति असलेली सामायिक वचनबद्धता आपल्या दोन्ही देशांना नैसर्गिक भागीदार बनवते. तंत्रज्ञान व शाश्वतता यांमधील सामायिक प्राधान्यक्रम आपल्या संबंधांना अनेक संधी देऊन परिपूर्ण करतात. म्हणूनच, आठ वर्षांपूर्वी, नॉर्डिक देशांसोबतच्या संबंधांना अधिक ऊर्जा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी आपण ही शिखर परिषद घेत आहोत.

पंतप्रधान मोदींचे नॉर्वेमध्ये आगमन

May 18th, 01:00 pm

पंतप्रधान मोदींचे ओस्लो, नॉर्वे येथे आगमन झाले, जी गेल्या चार दशकांहून अधिक काळातील भारताकडून नॉर्वेला झालेली पहिलीच पंतप्रधाकीय भेट ठरली. त्यांच्या आगमनावर पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांनी त्यांचे उत्साही स्वागत केले.

लोक काँग्रेस आणि बीआरएसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत: पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये

May 15th, 07:56 am

पंतप्रधान मोदी 15-20 मे 2026 दरम्यान युएई (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रप्रमुखांची भेट घेतील आणि प्रमुख क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करतील. या दौऱ्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये स्वीडनमधील 'युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री' आणि ओस्लो येथील '3 री भारत-नॉर्डिक शिखर परिषद' यांमधील त्यांच्या सहभागाचा समावेश आहे.

पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा ( 15 मे - 20 मे, 2026)

May 11th, 09:00 pm

पंतप्रधान मोदी 15 मे ते 20 मे 2026 या कालावधीत युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतील आणि विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करतील. नेदरलँड्समध्ये पंतप्रधान राजा विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतील आणि पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी चर्चा करतील. स्वीडनमध्ये ते पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्याशी संवाद साधतील. नॉर्वेमध्ये ते राजा हॅराल्ड 5 वे यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर, ते इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करण्यासाठी इटलीला भेट देतील.

फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती यांच्या भारत भेटीबाबत भारत-फिनलंड संयुक्त निवेदन

March 05th, 08:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती डॉ. अलेक्झांडर स्टब 4 ते 7 मार्च 2026 दरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर आले आहेत. आपल्या विद्यमान पदावर कार्यरत असताना राष्ट्रपती स्टब हे प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि मुंबईला भेट देत आहेत. त्यांच्यासोबत फिनलंडच्या हवामान आणि पर्यावरण मंत्री सारी मुलताला, फिनलंडचे रोजगार मंत्री मतियास मार्टिनेन तसेच अनेक अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे 11 व्या रायसीना संवादाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात फिनलँड चे राष्ट्रपती स्टब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी उद्घाटनप्रसंगी मुख्य भाषण दिले. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी फिनलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांच्या भारत भेटीनंतर राष्ट्रपती स्टब यांचा हा दौरा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद

April 15th, 06:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसेच जागतिक घडामोडींवर चर्चा केली.

पंतप्रधान आणि फ्रान्सचे अध्यक्ष यांच्या भेटीबाबतचे प्रसिद्धी पत्रक

May 04th, 10:43 pm

कोपनहेगनमधील दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेहून परतताना 4 मे 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचा अधिकृत दौरा केला.

दुसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद

May 04th, 07:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन, आईसलँडच्या पंतप्रधान कतरिन जोकोब्सदोतीर, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर स्टोर, स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मरीन यांच्यासह दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले.

पंतप्रधानांची फिनलंडच्या पंतप्रधानांसोबत बैठक

May 04th, 04:33 pm

दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने, कोपनहेगनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडच्या पंतप्रधान महामहिम सना मारिन यांच्यासोबत बैठक झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती.

पंतप्रधानांची आईसलँडच्या पंतप्रधानांसोबत बैठक

May 04th, 03:04 pm

दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर , कोपनहेगन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आईसलँडच्या पंतप्रधान महामहिम कॅटरिन जेकोब्सडोटीर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली.

पंतप्रधानांची स्वीडनच्या पंतप्रधानांशी चर्चा

May 04th, 02:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या भारत- नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोपनहेगन येथे स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.

पंतप्रधानांची नॉर्वेच्या पंतप्रधानांशी चर्चा

May 04th, 02:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गेर स्टोर यांची कोपनहेगन येथे दुसऱ्या भारत- नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. स्टोर यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये नॉर्वेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.

डेन्मार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमांना दिलेले निवेदन

May 03rd, 07:11 pm

आपले आणि आपल्या चमूला हार्दिक धन्यवाद! आपल्या या सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतामध्ये आपले स्वागत करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. या दोन्ही दौर्‍यांमुळे आपण आपले संबंध अधिक घनिष्ठ बनवून त्यांना गती देऊ शकलो. आपल्या दोन्ही देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि कायद्याचे राज्य यासारखी सामायिक मुल्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या दोन्ही देशांमध्ये अनेक पूरक बलस्थानेही आहेत.

डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादी

October 09th, 03:54 pm

डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादी

डेन्मार्कचे पंतप्रधान महामहिम मेट्टे फ्रेड्रीकसन यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे अभिभाषण

October 09th, 01:38 pm

कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी, हैदराबाद हाऊसमध्ये नियमितपणे सरकारचे प्रमुख आणि राज्यांच्या प्रमुखांचे स्वागत होत असे. गेल्या 18-20 महिन्यांपासून ही प्रक्रिया थांबली होती. मला आनंद आहे की आज एका नवीन मालिकेची सुरुवात डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीने होत आहे.

भारत आणि नॉर्डिक देशांमधल्या परिषदेबाबत संयुक्त निवेदन

April 18th, 12:57 pm

स्टॉकहोम येथे आज भारताचे पंतप्रधान आणि स्वीडनच्या पंतप्रधानांच्या यजमानतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोक्के रॉसमुसेन, फिनलंडचे पंतप्रधान जुहा सिपिला, आइसलंडच्या पंतप्रधान कतरिन जेकबसदॉतिर, नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी परिषद घेतली.

Visit of Prime Minister of India to Sweden (16-17 April 2018)

April 17th, 11:12 pm

During PM Modi's visit, India and Sweden hosted an India-Nordic Summit, entitled ‘India-Nordic Summit : Shared Values, Mutual Prosperity’. Prime Ministers of Denmark, Finland, Iceland and Norway attended the Summit. India has substantial economic ties with Nordic countries.  Annual India-Nordic trade is about $5.3 billion.  The cumulative Nordic FDI into India has been $2.5 billion.