India-New Zealand relationship built on enduring friendship, shared values, common commitment: PM Modi in Auckland
July 11th, 01:15 pm
PM Modi addressed a vibrant community event in Auckland, praising the Indian diaspora as a strong bridge between India and New Zealand. He highlighted the elevation of bilateral ties to a Strategic Partnership, celebrated 100 years of sporting ties between the two countries and underscored the shared heritage and deepening partnership between the two nations.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
July 11th, 12:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑकलंड येथे 'किया ओरा मोदी' कार्यक्रमात न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाच्या विशाल मेळाव्याला संबोधित केले. मोदी यांचा विशेष सन्मान म्हणून न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा मेळावा 10,000 हून अधिक भारतीय समुदायाच्या सदस्यांच्या स्नेह, ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला होता.India-New Zealand friendship has gained new momentum and a new direction: PM Modi during the Gala Lunch
July 11th, 12:32 pm
PM Modi attended a special gala luncheon hosted by New Zealand Prime Minister Christopher Luxon. Addressing the gathering, PM Modi welcomed the elevation of bilateral ties to the level of a Strategic Partnership. He said the India-New Zealand FTA would open new opportunities for both countries and help achieve the goal of doubling bilateral trade by 2030.न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या, भारत-न्यूझीलंड: एक यशस्वी भागीदारी, या विषयावरील विशेष कार्यक्रमात भारताच्या पंतप्रधान उपस्थित
July 11th, 12:30 pm
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी आयोजित केलेल्या भारत-न्यूझीलंड: एक यशस्वी भागीदारी, या विषयावरील एका विशेष स्नेहभोजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राजकीय, व्यापार, उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, क्रीडा आणि कला या क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधानांची न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसोबत अधिकृत चर्चा
July 11th, 08:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची आज ऑकलंडमधील गव्हर्नमेंट हाऊस येथे भेट घेतली. गव्हर्नमेंट हाऊसवर आगमन होताच पंतप्रधान मोदींचे पारंपरिक माओरी पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यात शांतता, आदर आणि आदरातिथ्याचे प्रतीक असणाऱ्या पारंपरिक माओरी कलांचा समावेश होता. या पारंपरिक स्वागतानंतर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी: 2030 पर्यंतचा मार्गदर्शक आराखडा
July 11th, 08:06 am
भारत आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची 11 जुलै 2026 रोजी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे भेट झाली आणि त्यांनी भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारीच्या निर्मितीची घोषणा केली. दोन्ही पंतप्रधानांनी या भागीदारीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि पुढील चार वर्षांत भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एक सामायिक चौकट म्हणून या 2030 पर्यंतच्या मार्गदर्शक आराखड्याला मान्यता दिली. या धोरणात्मक भागीदारीमध्ये, या आराखड्यात खालील स्तंभांमध्ये नमूद केलेली क्षेत्रे आणि उपक्रम समाविष्ट आहेत, परंतु ती केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित नाही.भारत-न्यूझीलंड संयुक्त निवेदन
July 11th, 07:59 am
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 जुलै 2026 रोजी ऑकलंड, न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या 40 वर्षांतला भारतीय पंतप्रधानाचा न्यूझीलंडचा हा पहिलाच दौरा असून, हा एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री व भागीदारीला एक नवीन दिशा देणारा आहे.भारत-न्यूझीलंड शिष्टमंडळ-स्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले प्रास्ताविक
July 11th, 07:00 am
काल रात्री तुमचे स्वतः विमानतळावर स्वागतासाठी येणे, हा आपल्यातच एक अतिशय मोठा आदर दर्शवणारा प्रसंग होता, आणि त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या तुमचे विशेष आभार व्यक्त करतो.