कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन

April 20th, 01:05 pm

राष्ट्राध्यक्ष ली यांच्या भारताच्या पहिल्या भेटीचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्यांचे जीवन हे चिकाटी, सेवा आणि समर्पणाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी प्रत्येक आव्हानाचा सामना करताना जनतेची सेवा करण्याचा आपला निर्धार अधिकच दृढ केला आहे. जरी हा त्यांचा भारताचा पहिलाच दौरा असला तरी, आपल्या पहिल्या भेटीपासूनच भारताबद्दलचा त्यांचा स्नेह आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून आली आहे.

भारत-कोरिया व्यापार परिषद -2018ला पंतप्रधानांनी केलेले संबोधन

February 27th, 11:00 am

मला आपल्या समवेत असण्याचा खूप आनंद होत आहे. कोरियन कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात असणे ही एक जागतिक कथा आहे. मी तुम्हाला या संधीचा फायदा घेऊन भारतात येण्यास आमंत्रित करीत आहे. भारत आणि कोरिया यांच्यातील संबंध शतकांपासून आहेत.