केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले

October 15th, 02:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. माझे प्रिय मित्र आणि केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. ते एक उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्व आणि भारताचे अत्यंत जवळचे मित्र होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या माझ्या कार्यकाळापासून त्यांना जवळून जाणून घेण्याचे भाग्य मला लाभले आणि त्यानंतर कित्येक वर्ष आमचा स्नेह पुढे सुरु राहिला, असे पंतप्रधान म्हणाले.रैला ओडिंगा यांना भारतीय संस्कृती, मूल्य आणि प्राचीन विद्वत्तेबद्दल विशेष आस्था होती आणि भारत-केनिया बंध दृढ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्याचे प्रतिबिंब नेहमीच उमटत असे, असेही पंतप्रधान म्हणाले.