जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

October 21st, 11:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे हार्दिक अभिनंदन केले. X या समाजमाध्यमावरच्या संदेशात, पंतप्रधान मोदींनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.