भारत - जपान मानव संसाधन देवाणघेवाण आणि सहकार्य कृती आराखडा

August 29th, 06:54 pm

भारत आणि जपान यांच्या दरम्यान होत असलेल्या व्दिपक्षीय कार्यक्रमामध्‍ये 5 वर्षात 500,000 कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण होईल. यामध्ये भारतातील 50,000 कुशल कर्मचारी आणि संभाव्य प्रतिभावंतांचा समावेश असणार आहे. भारत-जपान यांच्यामधील 2025 च्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान उभय देशांच्या पंतप्रधानांनी भेटी आणि देवाणघेवाणीद्वारे त्यांच्या नागरिकांमध्ये सखोल समज वाढवण्याची, मूल्ये सह-निर्माण करण्याची आणि संबंधित राष्ट्रीय प्राधान्यक्रम लक्षात घेवून कार्य करण्यासाठ, मानवी संसाधनांसाठी सहयोगी मार्ग शोधण्याच्या आवश्‍यकतेविषयी सहमती दर्शविली.

गुजरातमधील हंसलपूर येथे पर्यावरणपूरक वाहतूक उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

August 26th, 11:00 am

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, भारतातील जपानचे राजदूत केइची ओनो सान, सुजुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुजुकी सान, मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हिसाशी ताकेउची सान, अध्यक्ष आर. सी. भार्गव, हंसलपूर प्रकल्पातील सर्व कर्मचारी आणि उपस्थित मान्यवर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन

August 26th, 10:30 am

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने मोठी प्रगती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात भारताच्या 'मेक इन इंडिया' प्रवासात एक नवीन अध्याय जोडला जात आहे. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या सामायिक ध्येयाच्या दिशेने ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे असे ते म्हणाले. आजपासून भारतात उत्पादित होणारी इलेक्ट्रिक वाहने 100 देशांमध्ये निर्यात केली जाणार आहेत यावर मोदी यांनी भर दिला. देशात हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादन सुरू झाल्याची घोषणा त्यांनी केली. आजचा दिवस भारत आणि जपानमधील मैत्रीला एक नवीन आयाम जोडत आहे यावर भर देत, पंतप्रधानांनी भारतातील सर्व नागरिकांचे , जपानचे आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे मनापासून अभिनंदन केले.

जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

September 06th, 08:51 pm

जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्याशी असलेल्या आपल्या घनिष्ट मैत्रीला उजाळा दिला, आणि भारत-जपान संबंधांच्या क्षमतेवरील आबे सान यांचा दृढ विश्वास अधोरेखित केला. आबे यांच्या पत्नीने भारताबरोबर संबंध कायम ठेवल्याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले.