पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली

June 16th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्याशी चर्चा केली. अध्यक्षांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर, सायप्रसचे अध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी पंतप्रधानांचे समारंभपूर्वक औपचारिक स्वागत केले. काल सायप्रस इथे दाखल झाल्यानंतर क्रिस्टोडौलिडेस यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्नेहपूर्ण स्वागत केले यातून दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर विश्वास आणि चिरस्थायी मैत्री दिसून येते.