पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट
September 03rd, 08:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांची भेट घेतली. भारत आणि जर्मनी या वर्षी धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षे साजरी करत आहेत. चैतन्यपूर्ण लोकशाही आणि आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून, आम्हाला व्यापार, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शाश्वतता, उत्पादन आणि गतिशीलता या क्षेत्रात परस्पर लाभदायक सहकार्य वाढवण्याची मोठी क्षमता दिसते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट
June 17th, 11:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडातील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली. मे 2025 मध्ये चॅन्सलर मर्झ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधे झालेली ही पहिलीच भेट होती.निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल आणि पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी चॅन्सलर मर्झ यांचे अभिनंदन केले.अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबद्दल जर्मन सरकारने व्यक्त केलेल्या शोकसंवेदनांबद्दल पंतप्रधानांनी मनापासून आभार व्यक्त केले.