अंदमान आणि निकोबार व्दीपसमूहावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केलेले भाषण

January 23rd, 05:15 pm

नमस्कार ! अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल अॅमिरल डी. के. जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए न्यासाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आर.एस. छिकारा, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामधील सहभागी आणि आयएनएचे शाश्वत पुरूष लेफ्टनंट आर माधवन् !!

अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले संबोधित

January 23rd, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला संबोधित केले. 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा दिन म्हणजे गौरवशाली तारीख असल्याचे त्यांनी नमूद केले. नेताजींचे शौर्य आणि धाडस आपल्याला प्रेरणा देते आणि आपले मन त्यांच्याबद्दलच्या आदराने भारून जाते असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत पराक्रम दिन हा देशभावनेचा अविभाज्य सोहळा बनला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

Cabinet approves three new corridors as part of Delhi Metro’s Phase V (A) Project

December 24th, 03:25 pm

The Union Cabinet approved three new corridors - 1. R.K Ashram Marg to Indraprastha (9.913 Kms), 2. Aerocity to IGD Airport T-1 (2.263 kms) 3. Tughlakabad to Kalindi Kunj (3.9 kms) as part of Delhi Metro’s Phase – V(A) project consisting of 16.076 kms which will further enhance connectivity within the national capital. Total project cost of Delhi Metro’s Phase – V(A) project is Rs.12014.91 crore, which will be sourced from Government of India, Government of Delhi, and international funding agencies.

नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 31st, 07:00 pm

सर्वप्रथम, मला यायला विलंब झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज सरदार साहेबांची 150 वी जयंती आहे. एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्याचा विशेष कार्यक्रम होता, त्यामुळे मला उशीर झाला आणि मी वेळेवर पोहोचू शकलो नाही, आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी इथे आलो, त्यावेळी जे मंत्र ऐकले होते, त्यांची ऊर्जा आपल्याला आताही जाणवत आहे. जेव्हा जेव्हा मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळते, आणि जेव्हा जेव्हा मी येतो, तेव्हा तो एक दिव्य अनुभव असतो, एक अद्भुत अनुभव असतो. आणि हा स्वामी दयानंदजींचा आशीर्वाद आहे, त्यांच्या आदर्शांबद्दल आपल्या सर्वांना आदर आहे, तुम्हा सर्व विचारवंतांशी माझी अनेक दशकांची जवळीक आहे, त्यामुळे मला तुमच्यामध्ये पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळते. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटतो, तुमच्याशी संवाद साधतो, तेव्हा मला एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच प्रेरणा मिळते. आणि मला नुकतेच सांगण्यात आले की अशी आणखी नऊ सभागृहे बांधण्यात आली आहेत. तेथे आपले सर्व आर्य समाज सदस्य हा कार्यक्रम व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून पाहत आहेत. मी त्यांना पाहू शकत नाही, पण मी इथूनच त्यांना प्रमाण करतो.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात दिलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

October 31st, 09:00 am

सरदार पटेल यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीच्या या ऐतिहासिक दिवशी, एकता नगरची ही दिव्य प्रभात , हे विहंगम दृश्य, सरदार साहेबांच्या चरणांशी आमची उपस्थिती, आज आपण सर्व जण एका महान क्षणाचे साक्षीदार आहोत. देशभरात आयोजित एकता दौड, रन फॉर युनिटी , कोट्यवधी भारतीयांचा उत्साह, नूतन भारताच्या संकल्पशक्तीचा आपणा सर्वाना साक्षात्कार होतो आहे. नुकतेच इथे जे कार्यक्रम झाले, काल संध्याकाळी जे अद्भुत सादरीकरण झाले, त्यांच्यातही भूतकाळातील परंपरा होती, वर्तमानातील श्रम व शौर्य होते, आणि भविष्यकाळातील सिद्धतेची झलकही होती. सरदार साहेबांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ विशेष नाणे आणि विशेष टपाल तिकिटदेखील जारी केले गेले आहे. मी सर्व 140 कोटी देशवासियांना सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले

October 31st, 08:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. सरदार पटेल यांची 150 वी जयंती हा ऐतिहासिक सोहळा असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. एकता नगरमधील सकाळ दिव्य असून इथले विहंगम दृश्य विस्मयकारक असल्याचे सांगून मोदी यांनी सरदार पटेल यांच्या चरणी सामूहिक उपस्थिती असल्याचा उल्लेख केला आणि देश आज एका महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार होत असल्याचे सांगितले. त्यांनी देशव्यापी एकता दौड आणि कोट्यवधी भारतीयांच्या उत्साहपूर्ण सहभागाचा उल्लेख केला, आणि नव्या भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकारत असल्याचे अधोरेखित केले. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांचा आणि आदल्या संध्याकाळी झालेल्या उल्लेखनीय सादरीकरणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की यामधून भूतकाळातील परंपरा, वर्तमानातील श्रम आणि शौर्य तसेच भविष्यातील कामगिरीची झलक प्रतिबिंबित होत आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीच्या स्मृती प्रीत्यर्थ एक नाणे आणि विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशातील सर्व 140 कोटी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिलेला संदेश

January 23rd, 11:30 am

आज आपला देश विकसित भारताच्या संकल्पसिद्धीसाठी कार्यरत असताना नेताजी सुभाष यांच्या चरित्रातून आपल्याला निरंतर प्रेरणा मिळते. नेताजींच्या जीवनाचे सर्वात मोठे उद्दिष्ट होते- स्वतंत्र भारत. त्यांनी आपल्या संकल्पसिद्धीसाठी आपला निर्णय एकाच कसोटीवर पारखला- आझाद हिंद. नेताजींचा जन्म एका समृद्ध कुटुंबात झाला होता, त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. जर त्यांची इच्छा असती तर ते ब्रिटिश राजवटीत वरिष्ठ अधिकारी बनून आरामदायी जीवन जगू शकले असते, परंतु त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट सोसणे निवडले, आव्हाने निवडली, देशात आणि परदेशात कष्टदायक भ्रमंती केली, नेताजी कम्फर्ट झोनच्या बंधनात बांधले गेले नाहीत. त्याचप्रमाणे, आज आपल्या सर्वांना विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल. आपल्याला जागतिक स्तरावर स्वतःला सर्वोत्तम बनवायचे आहे, आपल्याला उत्कृष्टतेची निवड करावीच लागेल, आपल्याला कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

पराक्रम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मार्गदर्शन

January 23rd, 11:25 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांचे आदरपूर्वक स्मरण करत आहे, असे पंतप्रधानांनी या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देताना सांगितले. यावर्षी पराक्रम दिनाचा भव्य सोहळा नेताजींच्या ओदिशामधील जन्मस्थळी आयोजित केला जात असल्याचे पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहताना सांगितले. त्यांनी या प्रसंगी ओदिशा सरकारचे आणि जनतेचे अभिनंदन केले. ओदिशातील कटक येथे नेताजींच्या जीवन वारशावर आधारित एक विशाल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक कलाकारांनी नेताजींच्या जीवनाशी संबंधित घटना कॅनव्हासवर चित्रित केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. नेताजींवर आधारित अनेक पुस्तके देखील या प्रदर्शनात मांडल्याचे त्यांनी सांगितले. नेताजींच्या जीवन प्रवासातील हा संपूर्ण वारसा माझा युवा भारत किंवा माझा भारत यांना नवीन ऊर्जा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी सेंट्रल व्हिस्टा येथे साप्ताहिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कलांजली या अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले कौतुक

April 21st, 10:20 am

संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित कलांजली या अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. या अंतर्गत प्रत्येक आठवड्याच्या अखेरीला दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा, इंडिया गेट येथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

नवी दिल्लीत कर्तव्यपथच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 08th, 10:41 pm

आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. सर्व देशवासीय यावेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासियांचे मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. या ऐतिहासिक क्षणी, मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप पुरी जी, श्री जी किशन रेड्डी जी, श्री अर्जुनराम मेघवाल जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, श्री कौशल किशोर जी आज माझ्यासोबत मंचावर उपस्थित आहेत. देशातील अनेक मान्यवरही आज येथे उपस्थित आहेत.

PM inaugurates 'Kartavya Path' and unveils the statue of Netaji Subhas Chandra Bose at India Gate

September 08th, 07:00 pm

PM Modi inaugurated Kartavya Path and unveiled the statue of Netaji Subhas Chandra Bose. Kingsway i.e. Rajpath, the symbol of colonialism, has become a matter of history from today and has been erased forever. Today a new history has been created in the form of Kartavya Path, he said.

पंतप्रधान 8 सप्टेंबर रोजी 'कर्तव्य पथ' चे उद्‌घाटन आणि इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

September 07th, 01:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता 'कर्तव्य पथ' चे उद्‌घाटन करणार आहेत. सत्तेचे प्रतीक असलेले पूर्वीचे राजपथ हे आता कर्तव्य पथाकडे अर्थात जनतेची मालकी आणि त्यांच्या सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून बदलले जाणार आहे. याप्रसंगी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे. ही पावले ‘वसाहतवादी मानसिकतेचा कोणताही लवलेश मागे ठेवू नका’ या पंतप्रधानाच्या अमृत कालमधील नव भारताच्या दुसऱ्या ‘पंच प्रणा’ शी सुसंगत आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते येत्या 23 जूनला वाणिज्य भवनाचे आणि निर्यात पोर्टलचे उद्‌घाटन

June 22nd, 03:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, उद्या म्हणजेच येत्या 23 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता, वाणिज्य आणि उद्योग भवनाच्या 'वाणिज्य भवन' या नव्या इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधान निर्यात- (NIRYAT म्हणजेच व्यापाराच्या वार्षिक विश्लेषणासाठी राष्ट्रीय आयात-निर्यात नोंदी करणाऱ्या) पोर्टलचाही शुभारंभ करतील. भारताच्या परदेशी व्यापाराशी संबंधित आवश्यक ती सगळी माहिती संबंधित व्यक्तींना एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शनही करतील.

भारतीय संस्कृतीच्या चैतन्याने जगभरातील लोकांना कायम आकर्षित केले आहे: पंतप्रधान मोदी

January 30th, 11:30 am

मित्रहो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची देश पुनर्स्थापना करत आहे. इंडिया गेट जवळची अमर जवान ज्योत आणि जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरची प्रज्वलित ज्योत एकत्र करण्यात आल्याचे आपण पाहिले.या भावूक क्षणी अनेक देशवासीय आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले.राष्ट्रीय युद्ध स्मारकावर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या शूरवीरांची नावे कोरलेली आहेत.लष्कराच्या माजी सैनिकांनी मला पत्र लिहून कळवले आहे की शहिदांच्या स्मारकासमोर प्रज्वलित होत असलेली ‘अमर जवान ज्योत’ शहिदांच्या अमरत्वाचे प्रतिक आहे. खरोखरच अमर जवान ज्योतीप्रमाणेच आपले शहीद,त्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदानही अमर आहे. जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा राष्ट्रीय युध्द स्मारकाला आवर्जून भेट द्या असे माझे आपणा सर्वाना सांगणे आहे.आपले कुटुंबीय आणि मुलानाही घेऊन जा.इथे आपल्याला आगळीच उर्जा आणि प्रेरणा यांची प्रचीती येईल.

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 24th, 03:11 pm

Prime Minister Modi interacted with Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar awardees. He lauded that the children of India have shown their modern and scientific thinking towards vaccination programme. The PM also appealed to them to be an ambassador for Vocal for Local and lead the campaign of Aatmanirbhar Bharat.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद

January 24th, 11:53 am

Prime Minister Modi interacted with Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar awardees. He lauded that the children of India have shown their modern and scientific thinking towards vaccination programme. The PM also appealed to them to be an ambassador for Vocal for Local and lead the campaign of Aatmanirbhar Bharat.

केंद्रीय अर्थसंकल्पाचा ग्रामीण विकासावर सकारात्मक परिणाम या विषयावरील वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 23rd, 05:24 pm

Prime Minister Narendra Modi paid tribute to Netaji Subhas Chandra Bose on his 125th birth anniversary. Addressing the gathering, he said, The grand statue of Netaji, who had established the first independent government on the soil of India, and who gave us the confidence of achieving a sovereign and strong India, is being installed in digital form near India Gate. Soon this hologram statue will be replaced by a granite statue.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजींच्या होलोग्रॅम पुतळ्याचे अनावरण; तसेच सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारांचेही वितरण

January 23rd, 05:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत इंडिया गेट इथे,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रॅम पुतळ्याचे अनावरण झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ग्रॅनाईटच्या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत, हा होलोग्रॅमचा पुतळा तिथे राहणार आहे. नेताजींच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, याच ठिकाणी ग्रॅनाईटचा पुतळा बसवला जाणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करण्यासाठी इंडिया गेट येथे नेताजींचा एक भव्य पुतळा बसवण्यात येणार

January 21st, 07:46 pm

महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आणि वर्षभर चालणाऱ्या उत्सवांचा एक भाग म्हणून सरकारने इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुतळा ग्रॅनाइटपासून बनवलेला असून स्वातंत्र्यलढ्यातील नेताजींच्या अतुलनीय योगदानाला अतिशय समर्पक अभिवादन ठरेल आणि त्यांच्याविषयीच्या देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असेल. हा पुतळा तयार होईपर्यंत त्याच जागी नेताजींचा हॉलोग्राम पुतळा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी, 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजता इंडिया गेट येथे नेताजींच्या हॉलोग्राम पुतळ्याचे अनावरण करतील.

इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार : पंतप्रधान

January 21st, 03:00 pm

नवी दिल्ली येथील इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र यांचा पुतळा घडविण्याचे काम सुरु आहे. म्हणून नेताजीच्या जयंती दिनी 23 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान, याच पुतळ्याचा त्रिमित परिणाम साधणाऱ्या होलोग्रामचे अनावरण करणार आहेत.