पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इथिओपिया दौऱ्याच्या फलितांची यादी

December 16th, 10:41 pm

द्विपक्षीय संबंधांना 'धोरणात्मक भागीदारी' पर्यंत उन्नत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौरा

December 11th, 08:43 pm

जॉर्डनचे महामहिम राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 ते 16, डिसेंबर 2025 दरम्यान जॉर्डनच्या हॅशेमाइट प्रजासत्ताकला भेट देणार आहेत. या दौऱ्यात राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीदरम्यान पंतप्रधान, भारत आणि जॉर्डन यांच्यातील संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेणार आहेत; तसेच प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या दृष्टीकोनाची देवाणघेवाण करतील. भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या बैठकीच्या अनुषंगाने भारत-जॉर्डन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्‍यात येतील. याबरोबरच परस्पर विकास आणि समृद्धीच्या दृष्टीने नवनवीन क्षेत्रातील संधींचा आढावा घेणे आणि प्रादेशिक शांतता, समृद्धी, सुरक्षितता आणि स्थैर्य यासाठीची वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यावर यावेळी भर दिला जाईल.