लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातील नेत्यांकडून अभिनंदन
June 10th, 02:08 pm
लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील अनेक देशांच्या आणि सरकारांच्या प्रमुखांकडून अभिनंदनाचे संदेश प्राप्त झाले आहेत.डेन्मार्कच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल मेटे फ्रेडरिक्सन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
June 03rd, 06:45 pm
मेटे फ्रेडरिक्सन यांची डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.भारत आणि डेन्मार्क यांच्यात परस्पर विश्वास, सामायिक मूल्ये आणि शाश्वत भविष्यासाठी असलेल्या समान वचनबद्धतेवर आधारित एक मजबूत व दीर्घकालीन भागीदारी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणासाठी हे सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने दाखल झालेल्या डेन्मार्कच्या हंगामी पंतप्रधानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 19th, 06:40 pm
यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि सामायिक कृतीक्रमाच्या संदर्भात झालेल्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. पर्यावरण आणि हवामानबदलाच्या क्षेत्रांत सहयोगाला प्राधान्य देणाऱ्या भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीत झालेल्या प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये हरित व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी संसाधनांचे एकत्रीकरण करण्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. 2020 मध्ये हरित धोरणात्मक भागीदारीचा प्रारंभ झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये नियमितपणे झालेल्या उच्चस्तरीय आदान-प्रदानाची उजळणी करत दोन्ही नेत्यांनी येथून पुढे नवीन आणि उगवत्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तसेच संदेशवहन, प्रगत संशोधन, स्टार्टअप आणि शैक्षणिक आदान-प्रदान यांच्या बाबतीत सहयोग अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत सहकार्य करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. गुजरातमध्ये जीआयएफटी शहरात व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधानांनी डेन्मार्कच्या कंपन्यांना निमंत्रणही दिले.डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
September 16th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.