पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक क्रीडा कार्यक्रमानिमित्त मेलबर्न येथील क्रिकेट मैदानाला दिली भेट

July 10th, 08:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्न क्रिकेट मैदानावर आयोजित भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा संबंधांना समर्पित कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि व्हिक्टोरियाच्या प्रीमियर, जॅसिंटा ॲलन देखील उपस्थित होत्या. याशिवाय या कार्यक्रमाला स्टीव्ह वॉ आणि लिसा स्थळेकर यांच्यासह ऑस्टेलियातले इतर दिग्गज खेळाडू देखील उपस्थित होते. या भेटीमुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमधील आधारस्तंभ असलेले क्रीडाक्षेत्र, सांस्कृतिक आदानप्रदान आणि लोकांमधील संबंध यांचे महत्त्व अधोरेखित झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर-जनरल यांची घेतली भेट

July 09th, 01:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर-जनरल सॅम मॉस्टिन एसी यांची भेट घेतली.