जोहान्सबर्ग येथील जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट

November 23rd, 09:46 pm

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान साने ताकाची यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. 29 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान ताकाची यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर झालेली पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.

जी 20 शिखर परिषद 2025 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांची घेतली भेट

November 23rd, 09:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटालियन प्रजासत्ताकच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. याआधी जून मध्ये कॅनडा मध्ये काननास्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी संवाद साधला होता.

जोहनिबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट

November 23rd, 09:41 pm

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे सुरु असलेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.