मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

July 26th, 06:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या माले इथल्या आपल्या भेटीदरम्यान, मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला भारतीय पंतप्रधानांनी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच, राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी आदरातिथ्य केलेले पंतप्रधान मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

July 25th, 08:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माले येथील राष्ट्राध्यक्ष कार्यालयात मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले आणि रिपब्लिक स्क्वेअर येथे त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही भेट स्नेहमय होती, आणि दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचा दाखला देणारी होती.

युनायटेड किंगडम आणि मालदीव दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे प्रस्थान निवेदन

July 23rd, 01:05 pm

भारत आणि युके दरम्यान व्यापक धोरणात्मक भागीदारी असून, अलिकडच्या वर्षांत यामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. आमचे सहकार्य व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, शिक्षण, संशोधन, शाश्वतता, आरोग्य आणि परस्परांच्या जनतेमधील संबंध, यासह विविध क्षेत्रांमध्ये विस्तारले आहेत. पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या बरोबरच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमध्ये समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी परस्परांबरोबरची आर्थिक भागीदारी आणखी वाढवण्याची संधी आम्हाला मिळेल. या दौऱ्या दरम्यान, किंग चार्ल्स III (तृतीय) यांची भेट घेण्यासाठी देखील उत्सुक आहे.