पंतप्रधानांचे नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
August 09th, 07:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्साहाने सहभागी होण्याचे आणि विकसित भारत उभारण्यासाठी आपला सामूहिक संकल्प दृढ करण्याचे आवाहन केले आहे. तिरंगा हा भारताच्या अभिमानाचे प्रतीक असून प्रत्येक नागरिकाला देशासाठी सर्वोत्तम योगदान देण्यास, हा राष्ट्रध्वज सतत प्रेरणा देत असतो, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये भारताची संरक्षण शक्ती, नवोपक्रम आणि सामूहिक प्रयत्नांवर प्रकाश टाकला
July 26th, 11:30 am
Prime Minister Narendra Modi addressed the nation through Mann Ki Baat. In his speech, he highlighted important topics such as Kargil Vijay Diwas, Catch the Rain campaign, India's space sector prowess, Science Olympiads, Environmental conservation, Khadi and more. He called upon the citizens to share their ideas and suggestions for Independence Day through MyGov.पंतप्रधान मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी तुमच्या कल्पना आमच्यासोबत सामायिक करा.
July 25th, 02:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी नागरिकांना आपल्या कल्पना आणि सूचना सामायिक करण्याचे आवाहन केले आहे.India-New Zealand relationship built on enduring friendship, shared values, common commitment: PM Modi in Auckland
July 11th, 01:15 pm
PM Modi addressed a vibrant community event in Auckland, praising the Indian diaspora as a strong bridge between India and New Zealand. He highlighted the elevation of bilateral ties to a Strategic Partnership, celebrated 100 years of sporting ties between the two countries and underscored the shared heritage and deepening partnership between the two nations.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
July 11th, 12:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑकलंड येथे 'किया ओरा मोदी' कार्यक्रमात न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाच्या विशाल मेळाव्याला संबोधित केले. मोदी यांचा विशेष सन्मान म्हणून न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा मेळावा 10,000 हून अधिक भारतीय समुदायाच्या सदस्यांच्या स्नेह, ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला होता.Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament
July 07th, 03:15 pm
Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
July 07th, 03:00 pm
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेतअमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा
July 04th, 09:40 pm
अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक घटनेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प आणि अमेरिकेच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी आपल्या संदेशात भारत-अमेरिका यांच्यातील कायम टिकून असलेल्या भागीदारीची ताकद अधोरेखित केली आहे. या दोन लोकशाही देशांमधील संबंध धोरणात्मक भागीदारीच्याही पलीकडचे असून, ते दोन्ही देशांची समान लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि आपापल्या जनतेच्या अफाट क्षमतेवरील विश्वास या पायावर आधारलेले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी.
June 29th, 08:00 am
सेशेल्सचे राष्ट्रपती महामहीम डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. सेशेल्समधील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेतील विशेष चर्चेमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 08th, 12:30 pm
मी आपले आणि सदनातील सर्व माननीय सदस्यांचे हार्दिक आभार मानतो, आपण या महत्त्वाच्या क्षणानिमित्त एक सामूहिक चर्चेचा निर्णय घेतला. ज्या मंत्राने, ज्या जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा दिली होती, प्रेरणा दिली होती, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरमचे पुण्यस्मरण करणे, हे या सदनातील आपल्या सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे. आणि आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की वंदे मातरमच्या 150 वर्षांनिमित्त या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार ठरत आहोत. एक असा कालखंड जो आपल्या समोर इतिहासातल्या अगणित घटना समोर घेऊन येतो. ही चर्चा सदनाची वचनबद्धता तर प्रकट करेलच त्याचसोबत आगामी पिढ्यांसाठीही, प्रत्येक पिढीसाठी शिकवण ठरू शकेल, जर आपण सर्वांनी मिळून याचा सदुपयोग केला तर.वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
December 08th, 12:00 pm
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला उर्जा आणि प्रेरणा देणारा वंदे मातरम हा मंत्र आणि हे आवाहन आपण स्मरतो आहोत ही सभागृहातील सर्वांसाठी अत्यंत विशेष बाब आहे.आपल्या देशाला वंदे मातरमची ऐतिहासिक अशी 150 वी वर्षपूर्ती पाहायला मिळते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा कालावधी आपल्यासमोर इतिहासातील असंख्य घटना उभ्या करतो.या चर्चेद्वारे सदनाची कटिबद्धता दर्शवण्यासोबतच जर सगळ्यांनी या चर्चेचा चांगला उपयोग करून घेतला तर ही चर्चा भविष्यातील पिढ्यांसाठी शिक्षणाचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकते यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दर कपात आणि सुधारणांच्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जीएसटी परिषदेची केली प्रशंसा, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना याचा लाभ होईल
September 03rd, 11:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याचा लाभ सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना होईल. व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः छोटे व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय सुलभता सुनिश्चित होईल, असे मोदी म्हणाले.अहमदाबाद येथील कन्या वसतिगृह - सरदारधाम दुस-या टप्प्याच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 24th, 10:39 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, गुजरात सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार, सरदारधामचे प्रमुख गगजी भाई, विश्वस्त व्ही. के. पटेल, आणि इतर सर्व मान्यवर, आणि माझ्या प्रिय बंधून भगिनींनो, विशेषत्वाने प्रिय कन्या !!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबादच्या सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह येथील भूमिपूजन सोहळ्यातील भाषण
August 24th, 10:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह भूमिपूजन सोहळ्यास व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. उपस्थितांना उद्देशून बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सरदारधाम हे नाव जितके पवित्र आहे तितकेच त्याचे कार्यही पवित्र आहे. मुलींच्या शिक्षण व सेवेसाठी समर्पित अशा या वसतिगृहाच्या उद्घाटनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या वसतिगृहात राहणाऱ्या मुली आपल्या सोबत स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन येतील व त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर संधी येथे उपलब्ध होतील. या मुली आत्मनिर्भर आणि सक्षम झाल्यानंतर स्वाभाविकपणे राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतील तसेच त्यांचे कुटुंबही सक्षम होईल, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी या वसतिगृहात प्रवेश मिळविणाऱ्या सर्व मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
August 23rd, 10:10 pm
येथे जागतिक परिस्थिती, भू-अर्थशास्त्र यावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि जेव्हा आपण जागतिक संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद लक्षात येते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. तज्ज्ञ म्हणत आहेत की जागतिक विकासात भारताचे योगदान लवकरच सुमारे 20 टक्के असणार आहे. ही वाढ, ही लवचिकता, जी आपण भारताच्या अर्थव्यवस्थेत पाहत आहोत, ती गेल्या दशकात भारताने मिळवलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरतेमुळे आहे. आज आपली राजकोषीय तूट 4.4% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आणि हे असे घडत आहे जेव्हा आपण कोविडच्या इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे. आज आपल्या कंपन्या भांडवली बाजारातून विक्रमी निधी उभारत आहेत. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. महागाई खूप कमी आहे, व्याजदर कमी आहेत. आज आपली चालू खात्यातील तूट नियंत्रणात आहे. परकीय चलन साठा देखील खूप मजबूत आहे. इतकेच नाही तर दरमहा लाखो देशांतर्गत गुंतवणूकदार एस.आय.पी. द्वारे बाजारात हजारो कोटी रुपये गुंतवत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित
August 23rd, 05:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड लीडर्स फोरमसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागतही केले. हा उपक्रम अतिशय योग्य वेळी आयोजित केला असल्याचेही त्यांनी नमूद केले, आणि त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांची प्रशंसाही केली. मागच्या आठवड्यातच आपण लाल किल्ल्यावरून पुढच्या पिढीच्या सुधारणांबद्दल (नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स) भाषण केले होते आणि हा मंच त्याच भावनेला अधिक बळ देत आहे, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांचा शुभांशू शुक्ला यांच्यासोबतचा संवाद
August 19th, 09:43 am
तर तुम्हाला काही बदल जाणवत असतील, तुम्ही लोक कुठल्या प्रकारच्या अनुभवातून जाता, ते मी समजू इच्छितो.पंतप्रधानांनी अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी साधला संवाद
August 19th, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ नवी दिल्ली येथे अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी संवाद साधला. अंतराळ प्रवासाच्या परिवर्तनकारी अनुभवाबाबत मत व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की असा महत्त्वाचा प्रवास केल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीला बदल जाणवतच असेल. आणि अंतराळवीरांना हे परिवर्तन कसे वाटते आणि ते या परिवर्तनाचा कसा अनुभव घेतात हे समजून घ्यायला मला आवडेल. पंतप्रधानांच्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करत शुभांशु शुक्ला म्हणाले की अंतराळातील वातावरण अत्यंत वेगळ्या प्रकारचे असून, गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभाव हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.We are making Delhi a model of growth that reflects the spirit of a developing India: PM Modi
August 17th, 12:45 pm
During the inauguration of road projects worth ₹11,000 crore in Delhi, PM Modi said that the Dwarka Expressway and UER-II will enhance convenience for the people of Delhi and the entire NCR. He highlighted that a key feature of the UER is its role in freeing Delhi from garbage mounds, with millions of tonnes of waste material used in its construction. The PM also urged that “Vocal for Local” should become a life mantra for every citizen.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले 11,000 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
August 17th, 12:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील रोहिणी येथे सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या ठिकाणांच्या वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाकडे लक्ष वेधले. या द्रुतगती मार्गाचे नाव द्वारका आहे आणि हा कार्यक्रम रोहिणी येथे आयोजित केला जात आहे. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या उत्सवाच्या भावनेवर प्रकाश टाकला आणि आपण स्वतः द्वारकाधीशांच्या भूमीतून आलो आहेत या योगायोगाचा त्यांनी उल्लेख केला. संपूर्ण वातावरण भगवान श्रीकृष्णाच्या भावनेने ओथंबून गेले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.