पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
September 07th, 11:51 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2026 रोजी गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते दुपारी सुमारे 12 वाजता, वडोदरा इथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
August 01st, 11:45 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील भोगपुरम येथे 17,900 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.
August 01st, 11:30 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.PM to visit Andhra Pradesh and Karnataka on 1 August
July 31st, 09:56 am
PM Modi will visit Andhra Pradesh and Karnataka on 1 August. In Andhra Pradesh, he will inaugurate the Alluri Sitarama Raju International Airport and launch development projects worth over ₹17,900 crore. He will also lay the foundation stone for Andhra Pradesh's first semiconductor manufacturing facility. During his visit to Karnataka, he will inaugurate the Swami Vivekananda Cultural Youth Centre - Viveka Smaraka in Mysuru.The development of Chandigarh has always been the absolute priority of our government: PM Modi
July 17th, 02:08 pm
Launching multiple development projects in Chandigarh, PM Modi asserted that the development of Chandigarh has always been an absolute priority of the current government. He detailed the massive structural changes implemented in the region over the past decade. Congratulating the residents on the inauguration of healthcare, education and infrastructure projects, he also praised the city for striving to improve its cleanliness rankings.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंदीगडमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 17th, 01:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगडमध्ये आरोग्य, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. सुनियोजित राष्ट्रीय विकासाचे एक आदर्श उदाहरण अशी या शहराची ओळख असून येथील उत्तम जीवनशैली आणि सुलभ जीवनमानासाठी देखील ते ओळखले जाते यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रावर 'माँ चंडी'ची दैवी कृपा असल्याचे सांगत, त्यांनी या शहराच्या निरंतर आणि सुनियोजित विकासाप्रति प्रशासनाची असलेली दृढ कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. चंदीगडच्या विकासाला विद्यमान सरकारचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे, असे मोदी म्हणाले.India's Hydrogen Train stands as a remarkably successful testament to Make in India: PM Modi in Jind, Haryana
July 17th, 12:00 pm
PM Modi today launched various development projects in Jind, Haryana, spanning across sectors such as railways, highways, healthcare and cultural heritage. He also announced the launch of the country's first hydrogen-powered train. Celebrating the indigenous nature of this green mobility milestone, he emphasized that the entirely smoke-free train is a resounding, tangible triumph of the Make in India initiative. He noted that schemes like Khelo India and TOPS have benefited budding athletes.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 17th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर आनंद व्यक्त करत, पंतप्रधानांनी या प्रदेशाचा समृद्ध ऐतिहासिक, लढाऊ आणि आध्यात्मिक वारसा अधोरेखित केला; ज्याला 'शक्तीपीठ माता जयंती'चा विशेष आशीर्वाद लाभला आहे. अनेक दशकांपूर्वी संघटनात्मक कामांसाठी या शहराला दिलेल्या भेटींची आठवण सांगताना, त्यांनी तेथील लोकांकडून मिळालेल्या अविस्मरणीय प्रेमाचाही आवर्जून उल्लेख केला; तिथल्या 'मुर्रा' जातीच्या म्हशींचे दुग्धजन्य पदार्थ, 'देसी बुरा' आणि 'घेवर' यांसारख्या स्थानिक खाद्यपदार्थांशी हे नाते घट्टपणे जोडलेले आहे. ही काही सामान्य भूमी नाही; तर इतिहास, शौर्य, धर्म आणि असीम अभिमानाची ही एक महान भूमी आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधानांचा 20 जून रोजी ओदिशा दौरा
June 19th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून 2026 रोजी ओदिशाचा दौरा करणार आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानांसोबत या दौऱ्यात सहभागी होणार असून, ओदिशासाठी हा एक क्वचितच घडून येणारा महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे.From waste to wealth: PM Modi showcases Surat’s green development model
June 05th, 04:30 pm
At the launch of development projects in Surat, Gujarat, PM Modi called upon all elected representatives of local bodies to work even harder for the state's progress. Expressing pride in Surat being one of the cleanest cities in the country, he lauded the continuous efforts of all stakeholders. He credited Gujarat for its significant contribution to India's energy self-reliance, noting that the state produces one-fifth (50 GW) of the nation's 250 GW renewable energy capacity.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील सुरत येथे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचे उदघाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
June 05th, 04:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सुरत येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थित मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे त्यांच्या अढळ पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मी प्रथमच सुरतला भेट देत आहे. सुरत मधून मी संपूर्ण गुजरात मधील जनतेला अभिवादन करतो आणि अभिनंदन करतो असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान 5 जून रोजी सूरत आणि दमणला भेट देणार
June 04th, 10:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून, 2026 रोजी गुजरात आणि दमणला भेट देतील. दुपारी सुमारे 2:30 वाजता, पंतप्रधान सूरत जिल्ह्यातील हझिरा येथे भेट देतील आणि तेथील सुरू असलेल्या औद्योगिक कामकाजाचा तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर, संध्याकाळी 4:15 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान सूरतमध्ये सुमारे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात घेतले दर्शन
May 11th, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.हैदराबाद येथील विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 10th, 03:45 pm
तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान शिव प्रताप शुक्ला जी, राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी, बंडी संजय कुमार, संसदेतील माझे सहकारी कोंडा विश्वेश्वर रेड्डी जी, तेलंगणा सरकारचे मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, आणि उपस्थित मान्यवर!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
May 10th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी हैदराबाद हे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याचे परिवर्तनाच्यादृष्टीने असलेले महत्व अधोरेखित केले. तेलंगणा आणि संपूर्ण राष्ट्राच्या जलद गतीने होत असलेल्या विकासाला गती देण्याती हा प्रदेश बजावत असलेली महत्वाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. आज सुरू करण्यात आलेल्या मोठ्या स्तरावरील अनेक प्रकल्पांमुळे तेलंगण एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित होईल असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक स्तरावरच्या संपर्क व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी तेलंगणातील जनतेचे अभिनंदनही केले.पंतप्रधान 10 आणि 11 मे रोजी गुजरातच्या दौऱ्यावर
May 09th, 11:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 मे 2026 रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 10 मे रोजी उशिरा रात्री त्यांचे जामनगरमध्ये आगमन होईल. त्यानंतर, 11 मे रोजी सकाळी साधारण 10:15 वाजता पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होतील. तिथला कार्यक्रम आटोपून पंतप्रधान वडोदरासाठी रवाना होतील. संध्याकाळी साधारण 6 वाजता त्यांच्या हस्ते सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन होईल. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.पंतप्रधान 10 मे रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार
May 09th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे 2026 रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी साधारण 11 वाजता बंगळूरु येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होतील आणि याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होतील आणि दुपारी 3 च्या सुमारास ते, अंदाजे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगीही ते उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी 3:45 वाजता पंतप्रधान हैदराबादमधील सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील.लेह येथील ‘तथागतांच्या पवित्र अवशेषांच्या विशेष प्रदर्शनाच्या' उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
May 02nd, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल लेह येथे ‘तथागतांच्या पवित्र अवशेषांच्या विशेष प्रदर्शनाचे' उद्घाटन करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.Ganga Expressway to become new lifeline of Uttar Pradesh’s development: PM Modi in Hardoi
April 29th, 11:35 am
PM Modi inaugurated the 594-km access-controlled Ganga Expressway in Hardoi, calling it a new lifeline for Uttar Pradesh’s development that will boost connectivity, support farmers and create industrial opportunities across multiple districts. He said the expressway will also bring the possibilities of the NCR closer and strengthen the state’s role in the journey towards Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेशात हरदोई इथे, 594 किमी लांबीच्या प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
April 29th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील हरदोई इथे 594 किमी लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड गंगा द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी, भगवान नरसिंह यांच्या पवित्र भूमीला वंदन करून आणि जवळच वाहणाऱ्या गंगामातेच्या दैवी उपस्थितीचा उल्लेख करून केली. संपूर्ण उत्तरप्रदेश, गंगा नदीच्या आध्यात्मिक आणि पालनपोषण करणाऱ्या कृपेने पवित्र झालेले तीर्थक्षेत्र असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “उत्तर प्रदेशाला लाभलेले द्रुतगती मार्ग स्वतः गंगामातेचे आशीर्वाद आहेत,” असे मोदी म्हणाले. या द्रुतगती मार्गामुळे पवित्र स्थळांपर्यंतचा प्रवास काही तासांत शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.