संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या भारत भेटीची फलनि:ष्पत्ती
January 19th, 08:23 pm
गुजरात सरकार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या गुंतवणूक मंत्रालयादरम्यान धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक सहकार्याबाबत इरादापत्रस्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 27th, 11:01 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, जी. किशन रेड्डीजी, आंध्र प्रदेशचे उद्योग मंत्री, टी.जी. भरतजी, इन-स्पेसचे अध्यक्ष, पवन गोएंकाजी, टीम स्कायरूट, इतर मान्यवर, आणि सभ्य स्त्री-पुरूषहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 27th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत आहे आणि खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप येत आहे यावर त्यांनी भर दिला. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस भारताची नवीन विचारसरणी, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे प्रतिबिंब आहे यावर भर देत त्यांनी अधोरेखित केले की देशातील नवोन्मेष , युवकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत भारत आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येईल याचे प्रतिबिंब म्हणजे आजचा कार्यक्रम आहे असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांना शुभेच्छा दिल्या आणि नमूद केले की हे दोन्ही युवा उद्योजक देशभरातील असंख्य तरुण अंतराळ उद्योजकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. दोघांनीही स्वतःवर विश्वास ठेवला, जोखीम घेण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि परिणामी आज संपूर्ण देश त्यांचे यश पाहत आहे आणि देशाला त्यांचा अभिमान वाटत आहे यावर त्यांनी भर दिला .निवडणूक आयोगाने वेळोवेळी आपली मतदान प्रक्रिया मजबूत केली आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
January 19th, 11:30 am
In the 118th episode of Mann Ki Baat, PM Modi reflected on key milestones, including the upcoming 75th Republic Day celebrations and the significance of India’s Constitution in shaping the nation’s democracy. He highlighted India’s achievements and advancements in space sector like satellite docking. He spoke about the Maha Kumbh in Prayagraj and paid tributes to Netaji Subhas Chandra Bose.गयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.IN-SPACE च्या देखरेखीखाली अंतराळ क्षेत्रासाठी 1,000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 24th, 03:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इन-स्पेस (IN-SPACE) च्या देखरेखीखाली, अंतराळ क्षेत्रासाठी समर्पित 1000 कोटी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करायला मंजुरी दिली.एसएसएलव्ही-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे केले अभिनंदन
August 16th, 01:48 pm
नवीन उपग्रह प्रक्षेपक (एसएसएलव्ही)-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.अवकाश संशोधन क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणातील सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
February 21st, 11:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाश संशोधन क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणातील सुधारणेला मंजुरी देण्यात आली. आता उपग्रहांशी संबंधित उप-क्षेत्र तीन वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये विभागले जाणार असून त्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकीच्या मर्यादा निश्चित केलेल्या असतील.If the world praises India it's because of your vote which elected a majority government in the Centre: PM Modi in Mudbidri
May 03rd, 11:01 am
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi today addressed a mega public meeting in Karnataka’s Mudbidri. May 10th, the day of the polls, is fast approaching. The BJP is determined to make Karnataka the top state and BJP's resolve is to make Karnataka a manufacturing super power. This is our roadmap for the coming years,” stated PM Modi.PM Modi addresses public meetings in Karnataka’s Mudbidri, Ankola and Bailhongal
May 03rd, 11:00 am
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi today addressed a mega public meeting in Karnataka’s Mudbidri. May 10th, the day of the polls, is fast approaching. The BJP is determined to make Karnataka the top state and BJP's resolve is to make Karnataka a manufacturing super power. This is our roadmap for the coming years,” stated PM Modi.विक्रम-एस या भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रो आणि इन-स्पेस यांचे केले अभिनंदन
November 18th, 05:33 pm
विक्रम-एस अर्थात विक्रम सबऑर्बिटल या स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संघटना तसेच इन-स्पेस अर्थात भारतीय राष्ट्रीय अवकाश कार्यक्रम प्रोत्साहन आणि अधिकृतता केंद्र या संस्थांचे अभिनंदन केले आहे.सौर आणि अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या चमत्कारांमुळे जग विस्मयचकित: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
October 30th, 11:30 am
आताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. 'सौर ऊर्जा'हे सूर्यदेवाचे वरदान आहे. सौरऊर्जा हा आज एक असा विषय आहे, ज्यात अवघ्या जगाला आपले भविष्य दिसते आहे आणि भारतासाठी तरशतकानुशतकेसूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही, तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे, त्यामुळेच आज सौरऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे.पंतप्रधानांनी सर्वात अवजड उपग्रह वाहक रॉकेट 'लाँच व्हेईकल मार्क 3' (LVM3) च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल भारतीय अंतराळ संस्था, एनएसआयएल( NSIL), इन स्पेस(IN-SPACe) आणि इस्रो (ISRO) चे अभिनंदन केले
October 23rd, 10:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात वजनदार वाहक रॉकेट 'लाँच व्हेईकल मार्क 3' (LVM3) चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल भारतीय अंतराळ संस्था एनएसआयएल( NSIL), इन स्पेस(IN-SPACe) आणि इस्रो (ISRO) चे अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी गांधीनगर, गुजरात येथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 च्या उद्घाटनाप्रसंगी केलेले भाषण
July 04th, 10:57 pm
आजचा हा कार्यक्रम 21 व्या शतकात अधिकाधिक आधुनिक होत असलेल्या भारताची झलक घेऊन आला आहे.संपूर्ण मानवतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर किती क्रांतिकारी आहे याचे उदाहरण भारताने डिजिटल इंडिया मोहिमेच्या रूपात संपूर्ण जगासमोर ठेवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे गांधीनगर इथे उद्घाटन
July 04th, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर इथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उद्घाटन केले. नव भारताची तंत्रज्ञान प्रेरणा ही याची संकल्पना आहे. जीवन सुखकर करण्यासाठी आणि स्टार्ट अप्सना चालना देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि सेवा प्रदान करणे अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी विविध डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांनी यावेळी केला. चिप्स टू स्टार्ट अप्स (C2S) कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या 30 संस्थांच्या समूहाची पंतप्रधानांनी घोषणा केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, लोकप्रतिनिधी, स्टार्ट अप्सचे प्रतिनिधी आणि या क्षेत्रातले संबंधित यावेळी उपस्थित होते.पीएसएलव्ही- सी53 या प्रक्षेपकाद्वारे भारतीय स्टार्ट अपच्या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधानांकडून इन-स्पेस आणि इस्रोचे अभिनंदन
July 01st, 09:22 am
पीएसएलव्ही- सी53 या प्रक्षेपकाद्वारे भारतीय स्टार्ट अपच्या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन-स्पेस आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे.10 जून रोजी पंतप्रधान देणार गुजरातला भेट
June 08th, 07:23 pm
येत्या 10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी 10:15 च्या सुमारास नवसारी येथे 'गुजरात गौरव अभियानात' विविध विकासकामांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. त्यानंतर अंदाजे 12:15 वाजता ते नवसारीमध्येच ए.एम.नाईक आरोग्यसेवा संकुलाचे आणि निराली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. नंतर अंदाजे दुपारी 3:45 वाजता अहमदाबादमध्ये बोपाल येथे आयएन-एसपीएसीइ म्हणजे इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरच्या मुख्यालायचेही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.