'इमिग्रेशन, व्हिसा, परदेशी नागरिक नोंदणी आणि ट्रॅकिंग' (IVFRT) योजनेच्या विस्ताराला मंत्रिमंडळाची मंजुरी
March 25th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने, 'इमिग्रेशन, व्हिसा, परदेशी नागरिक नोंदणी आणि ट्रॅकिंग' (आयव्हीएफआरटी) योजनेचा कालावधी 31 मार्च, 2026 नंतर आणखी पाच वर्षे पुढे वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आता ही योजना 1 एप्रिल, 2026 ते 31 मार्च, 2031 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सुरू राहील. या योजनेसाठी 1,800 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.