फलनिष्पत्ती : मॉरीशसच्या पंतप्रधानांचा भारत दौरा
September 11th, 02:10 pm
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि मॉरीशस प्रजासत्ताकाचे तृतीयक शिक्षण, विज्ञान आणि संशोधन मंत्रालय यांच्यादरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेले निवेदन
September 11th, 12:30 pm
आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या गंगेच्या अखंड, अविरत प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.