Cabinet approves extension and restructuring of Jal Jeevan Mission
March 10th, 04:12 pm
The Union Cabinet chaired by PM Modi has approved the Ministry of Jal Shakti’s proposal to restructure and reorient the implementation of the Jal Jeevan Mission. JJM 2.0 fosters the vision of Viksit Bharat @2047 with assured 24×7 rural drinking water supply by shifting from infrastructure-centric approach to a citizen-centric utility-based service delivery approach through Structural Reforms.पंतप्रधान 14 फेब्रुवारी रोजी देणार आसामला भेट
February 13th, 11:38 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2026 रोजी आसामला भेट देतील. सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान दिब्रुगडमधील मोरन बायपासवरील आपत्कालीन लँडिंग प्लॅटफॉर्मवर (ईएलएफ) पंतप्रधान उतरतील, तेथे ते लढाऊ विमाने, वाहतूक आणि हेलिकॉप्टर यांची हवाई प्रात्यक्षिके पाहतील. दुपारी 1 वाजता, पंतप्रधान ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूला भेट देतील. त्यानंतर, दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान गुवाहाटीतील लाचित घाट येथे 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवतील.ओमानमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर
December 18th, 12:32 pm
तुम्हा युवकांचा जोश आणि ही ऊर्जा, इथले सारे वातावरण खऱ्या अर्थाने चैतन्यमय झाले आहे. या सभागृहात पुरेशी जागा नसल्यामुळे जे बंधू आणि भगिनी आत येऊ शकले नाहीत व जवळच्या हॉल मध्ये स्क्रीनवर हा प्रोग्रॅम लाईव्ह पाहत आहेत, त्यांनाही मी नमस्कार करतो. तुम्ही कल्पना करू शकता की इथपर्यंत येऊनही त्यांना सभागृहात प्रवेश मिळू न शकल्याने त्यांच्या मनात काय भावना असतील, याची आपण कल्पनाच करू शकतो.पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
December 18th, 12:31 pm
पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत.आसाममध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थापनेबद्दल पंतप्रधानांनी आसामच्या जनतेचे केले अभिनंदन
August 20th, 07:48 pm
आसाममध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) स्थापन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.श्री नारायण गुरु आणि गांधीजी यांच्यातील संवादाच्या शताब्दीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 24th, 11:30 am
आज हा परिसर देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व घटनेचे स्मरण करण्याचा साक्षीदार होतो आहे. ती एक अशी ऐतिहासिक घटना होती, ज्या घटनेने आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ एक नवीन दिशा दिली नाही तर स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला ठोस अर्थ दिला. शंभर वर्षांपूर्वीची श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची ती भेट आजही तितकीच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेली ती भेट आजही सामाजिक सौहार्द आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी श्री नारायण गुरुंच्या चरणी प्रणाम करतो. गांधीजींनाही मी आदरांजली वाहतो.श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
June 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देणारी ही एक ऐतिहासिक घटना होती, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांना तिने ठोस अर्थ दिला,असे त्यांनी सांगितले. श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यात 100 वर्षांपूर्वी झालेली ही भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, आणि सामाजिक सलोखा आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी श्री नारायण गुरूंच्या चरणी वंदन केले आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 13th, 12:30 pm
नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितिन गडकरी जी, जितेंद्र सिंह जी, अजय टम्टा जी, उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी जी, विरोधी पक्षनेता सुनील शर्मा जी, सर्व खासदार, आमदार आणि जम्मू-कश्मीर च्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन
January 13th, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, आव्हाने असूनही आपला संकल्प डगमगला नाही. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार आणि बांधिलकीचे तसेच काम पूर्ण करताना आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 7 मजुरांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.The people of Jammu and Kashmir are tired of the three-family rule of Congress, NC and PDP: PM Modi
September 28th, 12:35 pm
Addressing a massive rally in Jammu, PM Modi began his speech by paying tribute to Shaheed Sardar Bhagat Singh on his birth anniversary, honoring him as a source of inspiration for millions of Indian youth. In his final rally for the J&K assembly elections, PM Modi reflected on his visits across Jammu and Kashmir over the past weeks, noting the tremendous enthusiasm for the BJP everywhere he went.PM Modi captivates the audience at Jammu rally
September 28th, 12:15 pm
Addressing a massive rally in Jammu, PM Modi began his speech by paying tribute to Shaheed Sardar Bhagat Singh on his birth anniversary, honoring him as a source of inspiration for millions of Indian youth. In his final rally for the J&K assembly elections, PM Modi reflected on his visits across Jammu and Kashmir over the past weeks, noting the tremendous enthusiasm for the BJP everywhere he went.पंतप्रधानांनी न्यूयॉर्क, अमेरिकेमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेले भाषण
September 22nd, 10:00 pm
नमस्कार अमेरिका, आता आपले नमस्ते देखील बहुराष्ट्रीय बनले आहे, स्थानिक ते जागतिक, आणि हे सर्व तुम्ही केले आहे. भारताला हृदयात ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाने ते केले आहे.पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
September 22nd, 09:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड येथे, एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमाला 15,000 हून अधिक लोक उपस्थित होते.श्रीनगर इथे 'युवा सशक्तिकरण, जम्मू काश्मीरचा कायापालट' या कार्यक्रमातले पंतप्रधानांचे संबोधन
June 20th, 07:00 pm
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा जी,केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी श्री प्रतापराव जाधव जी, इतर सर्व मान्यवर आणि जम्मू काश्मिरच्या काना कोपऱ्यातून जोडले गेलेले माझे युवा मित्र आणि सर्व बंधू भगिनींनो !पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे ‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला केले संबोधित
June 20th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे ‘‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली , ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांनी 1,800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. मोदी यांनी सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 200 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित करण्याचा देखील प्रारंभ केला.या प्रसंगी, पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील यशस्वी युवकांशी संवाद साधला.यावेळची निवडणूक म्हणजे एनडीएच्या नेतृत्वाखालील सरकारचे 'संतुष्टिकरण' मॉडेल विरुद्ध काँग्रेस-सपाचे 'तुष्टिकरण मॉडेल' यांच्यातील लढत आहे: पीएम मोदी यूपीतील जौनपूर येथे
May 16th, 11:15 am
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये जौनपूर येथे अत्यंत जोशात पार पडलेल्या विराट प्रचारसभेला संबोधित केले. ते म्हणाले, जग मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे पाहत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' हे जगाला आता ठामपणे पटले आहे, असेही ते पुढे म्हणाले.CAA हे मोदींच्या गॅरंटीचे उदाहरण: पंतप्रधान मोदी यूपीतील लालगंज येथे
May 16th, 11:10 am
2024 च्या लोकसभा निवडणूक पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज घेतलेल्या निवडणूक रॅलीमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले.ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' याची आता जगाला खात्री वाटत आहे, असे ते म्हणाले.उत्तर प्रदेशातील लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे पंतप्रधान मोदींच्या जोरदार प्रचार सभा
May 16th, 11:00 am
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे घेतलेल्या निवडणूक रॅलींमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' येणार याची जगाला खात्री पटली आहे, असेही ते पुढे म्हणाले .