आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे निवेदन
November 23rd, 12:45 pm
जोहानस-बर्ग” सारख्या जिवंत आणि सुंदर शहरात आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या बैठकीसाठी मी आयबीएसए चे अध्यक्ष राष्ट्रपति लुला यांचे मनापासून आभार मानतो. आणि राष्ट्रपति रामाफोसा यांना आदरातिथ्याबद्दल धन्यवाद देतो.जोहान्सबर्ग येथे आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
November 23rd, 12:30 pm
ही बैठक अत्यंत योग्य वेळी होत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की ही बैठक आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या पहिल्या जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली असून ग्लोबल साउथ देशांच्या सलग चार जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा समारोप करते. या चारपैकी शेवटची तीन अध्यक्षपदे भारत - ब्राझील - दक्षिण आफ्रिका संवाद मंच (आयबीएसए) सदस्य राष्ट्रांकडे होती. या दरम्यान मानव-केंद्रित विकास, बहुपक्षीय सुधारणा आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.PM Modi arrives in Johannesburg, South Africa to participate in G20 Summit
November 21st, 06:25 pm
PM Modi arrived in Johannesburg, South Africa, a short while ago. The PM will attend the 20th G20 Leaders’ Summit. On the margins of the Summit, he will also hold bilateral meetings with world leaders and will also participate in the India-Brazil-South Africa (IBSA) Leaders’ Meeting.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक दौऱ्याला रवाना होण्यापूर्वीचे निवेदन
November 21st, 06:45 am
मी 21-23 नोव्हेंबर 2025 दरम्यान दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचा दौरा करत आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 20 व्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.