जहाजबांधणी,नौवहन तसेच सागरी मालवाहतूक यांमधील भागीदारीसाठी भारत-आरओके व्यापक आराखडा

April 20th, 10:51 pm

दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी कोरिया प्रजासत्ताकाचे (आरओके) राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग भारत भेटीवर आलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ली जे म्युंग यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी जहाजबांधणी, नौवहन तसेच सागरी मालवाहतूक या क्षेत्रांतील भागीदारीसाठी सरकारचे विभाग आणि खासगी संस्था यांच्यादरम्यान परस्पर लाभदायक सहकार्याबाबत आपापल्या विचारांची फलदायी आणि सखोल देवाणघेवाण केली.

कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन

April 20th, 01:05 pm

राष्ट्राध्यक्ष ली यांच्या भारताच्या पहिल्या भेटीचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्यांचे जीवन हे चिकाटी, सेवा आणि समर्पणाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी प्रत्येक आव्हानाचा सामना करताना जनतेची सेवा करण्याचा आपला निर्धार अधिकच दृढ केला आहे. जरी हा त्यांचा भारताचा पहिलाच दौरा असला तरी, आपल्या पहिल्या भेटीपासूनच भारताबद्दलचा त्यांचा स्नेह आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून आली आहे.

पंतप्रधानांनी ऊर्जा क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी साधला संवाद

January 28th, 09:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी इंडिया एनर्जी वीक (आयईडब्ल्यू) 2026 च्या निमित्ताने जागतिक ऊर्जा क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.