Prime Minister meets Andhra Pradesh Chief Minister Shri N. Chandrababu Naidu and his family in Hyderabad
May 10th, 10:07 pm
PM Modi met the Chief Minister of Andhra Pradesh N. Chandrababu Naidu and his family at his residence in Hyderabad. The PM expressed happiness at meeting the Chief Minister and exchanging views on a wide range of subjects and perse issues.पंतप्रधान मोदींचे जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयाला खंबीर आवाहन
May 10th, 08:39 pm
पंतप्रधान मोदींनी हैदराबादमधील एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अलीकडील संघर्ष आणि पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक आव्हानांवर भाष्य केले आणि भारताची लवचिकता मजबूत करण्यासाठी सामूहिक राष्ट्रीय जबाबदारीचे आवाहन केले. आयातीवरील ताण कमी करण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी त्यांनी नागरिकांना इंधन वापर कमी करणे, कारपूलिंगला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.हैदराबाद इथल्या सिंधू रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
May 10th, 07:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबादमध्ये 'सिंधू रुग्णालयाचे' उद्घाटन केले. हे रुग्णालय, हैदराबाद शहर आणि आसपासच्या परिसरातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने उचललेले एक कौतुकास्पद पाऊल आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसेच, रुग्णालयाच्या व्यवस्थापन व वैद्यकीय चमूने उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतींच्या वापराला दिलेल्या विशेष प्राधान्याचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.People are fed up off Congress and BRS' politics of nepotism: PM Modi in Hyderabad
May 10th, 06:05 pm
PM Modi addressed a massive public rally in Hyderabad, Telangana, where he spoke on India’s rising global stature, the significance of BJP’s recent electoral victories and the country’s collective responsibility during ongoing global economic and geopolitical challenges.PM Modi’s massive rally in Hyderabad focuses on self-reliance and a Viksit Telangana
May 10th, 06:00 pm
PM Modi addressed a massive public rally in Hyderabad, Telangana, where he spoke on India’s rising global stature, the significance of BJP’s recent electoral victories and the country’s collective responsibility during ongoing global economic and geopolitical challenges.हैदराबाद येथील विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 10th, 03:45 pm
तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान शिव प्रताप शुक्ला जी, राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी, बंडी संजय कुमार, संसदेतील माझे सहकारी कोंडा विश्वेश्वर रेड्डी जी, तेलंगणा सरकारचे मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, आणि उपस्थित मान्यवर!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
May 10th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी हैदराबाद हे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याचे परिवर्तनाच्यादृष्टीने असलेले महत्व अधोरेखित केले. तेलंगणा आणि संपूर्ण राष्ट्राच्या जलद गतीने होत असलेल्या विकासाला गती देण्याती हा प्रदेश बजावत असलेली महत्वाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. आज सुरू करण्यात आलेल्या मोठ्या स्तरावरील अनेक प्रकल्पांमुळे तेलंगण एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित होईल असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक स्तरावरच्या संपर्क व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी तेलंगणातील जनतेचे अभिनंदनही केले.पंतप्रधान 10 मे रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार
May 09th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे 2026 रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी साधारण 11 वाजता बंगळूरु येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होतील आणि याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होतील आणि दुपारी 3 च्या सुमारास ते, अंदाजे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगीही ते उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी 3:45 वाजता पंतप्रधान हैदराबादमधील सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील.भारत-कॅनडा मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदेतील पंतप्रधानांच्या सीईओ फोरम मधील भाषणाचा मजकूर
March 02nd, 02:30 pm
आज आपण भारत-कॅनडा संबंधांमध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहोत. पंतप्रधान कार्नी यांचा एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, परंतु आपल्या संबंधांनी जणू एका प्रकाशवर्षाची झेप घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत विश्वास वाढला आहे, स्पष्टता आली आहे आणि नवीन गती निर्माण झाली आहे. हे सर्व त्या काळात घडत आहे, जेव्हा जग आर्थिक अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे आणि जागतिक आर्थिक व्यवस्था दबावाखाली आहे. अशा वेळी भारत आणि कॅनडातील व्यावसायिक नेत्यांचे हे चिंतन आपल्या भागीदारीचा नवीन आराखडा तयार करेल. आपणा सर्वांच्या दृष्टीकोन आणि बांधिलकीचे मी अभिनंदन करतो.तामिळनाडूच्या मदुराई येथे विविध पायाभूत सुविधांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 03:30 pm
मी पवित्र आणि ऐतिहासिक शहर मदुराईमध्ये येऊन सन्मानित झाल्याचा अनुभव घेत आहे. मी मीनाक्षी अम्मन आणि भगवान सुंदरेश्वर यांना नमन करतो. आजचा कार्यक्रम तामिळनाडूच्या विकास यात्रेतील एका गौरवपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. आम्ही 4,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन केले आणि ते राष्ट्राला समर्पित केले आहेत. हे प्रकल्प संपर्कव्यवस्थेत बदल घडवून आणतील, अर्थव्यवस्थेला चालना देतील, रोजगार निर्माण करतील आणि लाखो लोकांचे जीवन बदलून टाकतील. यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळेल आणि तीर्थयात्री व पर्यटकांचा प्रवास सुलभ होईल. तसेच व्यवसायांसाठी जलद वाहतुकीची सोय होईल. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे लोकांना सक्षम बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदुराईमध्ये रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण तसेच भूमिपूजन
March 01st, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील मदुराई येथे रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पवित्र मदुराई नगरीत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस तामिळनाडूच्या विकास प्रवासातील अभिमानास्पद अध्याय आहे. हे प्रकल्प संपर्क व्यवस्थेचा आमूलाग्र बदल, अर्थव्यवस्थेला चालना आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यासोबतच राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवतील.Cabinet approves the widening of National Highway-167 in Telangana worth Rs.3175.08 crore
February 14th, 01:00 pm
The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by PM Modi, has approved the widening of National Highway-167 from Gudebellur to Mahabubnagar on the Hyderabad-Panaji Economic Corridor to 4-lane standards in Telangana, worth Rs. 3175.08 crore. It will provide seamless connectivity to key economic, social and logistics nodes across Telangana and provide employment opportunities.हैदराबादमधील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
November 26th, 10:10 am
“भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जी, सफ्रान समूहाशी संबंधित सर्व मान्यवर, आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 26th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्र म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा केंद्र युवकांसाठी उच्च तंत्रज्ञानाधारित हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण 24 नोव्हेंबर रोजी सफ्रानच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला होता आणि त्यांच्याबरोबर याआधीही झालेल्या चर्चेत भारताबद्दलचा त्यांचा विश्वास आणि आशा दिसून आली होती, असे पंतप्रधान म्हणाले. सफ्रानची भारतातील गुंतवणूक देखील त्याच गतीने कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांची सफ्रानच्या टीमचे नवीन सुविधेबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे 26 नोव्हेंबर रोजी करणार उद्घाटन
November 25th, 04:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (127 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
October 26th, 11:30 am
अशा कठीण काळात सुमारे वीस वर्षांचा एक युवक या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. आज मी या तरुणाबद्दल एका खास कारणासाठी चर्चा करत आहे. त्याचे नाव उघड करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एकही शब्द बोलणे गुन्हा मानले जात असे, तेव्हा या तरुणाने सिद्दीकी नावाच्या निजामाच्या अधिकाऱ्याला उघडपणे आव्हान दिले. निजामाने सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचं पीक जप्त करण्यासाठी पाठवलं होते. परंतु अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीची हत्या केली. तो अटकेपासून स्वतः ला वाचवण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या जुलमी पोलिसांपासून सुटका करून घेऊन तो तरुण शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममध्ये पोहोचला.पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेले भाषण
September 21st, 06:09 pm
उद्यापासून शक्तीच्या उपासनेचा उत्सव अर्थात नवरात्र सुरू होत आहे. तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपला देश आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे आणि मोठे पाऊल टाकत आहे. उद्या, २२ सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा सूर्य उगवताच पुढील टप्प्यातल्या जीएसटी सुधारणा लागू होतील. एका अर्थाने उद्यापासून देशात जीएसटी बचत महोत्सवाला सुरुवात होत आहे. या जीएसटी बचत महोत्सवामुळे तुमची बचत वाढेल आणि तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करू शकाल. आपल्या देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नव-मध्यमवर्गीय, युवा, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना या बचत महोत्सवाचा मोठा फायदा होईल. याचा अर्थ असा की या उत्सवाच्या काळात प्रत्येकाला काहीतरी गोड खाण्यास मिळेल आणि देशातील प्रत्येक कुटुंबात आनंद वाढेल. पुढील टप्प्यातल्या या जीएसटी सुधारणा आणि बचत महोत्सवाबद्दल मी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. या सुधारणांमुळे भारताच्या विकासगाथेला वेग लाभेल, , व्यवसाय सुलभ होईल, गुंतवणूक अधिक आकर्षक होईल आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्य समान भागीदार होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले संबोधित
September 21st, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाला संबोधित केले. शक्तीच्या उपासनेचे पर्व असलेल्या नवरात्रीच्या प्रारंभानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत ते म्हणाले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच देश आत्मनिर्भर भारत अभियानासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयाबरोबरच देशात नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांची अंमलबजावणी होईल. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की एका प्रकारे संपूर्ण भारतात जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवामुळे बचत वाढेल आणि लोकांना त्यांच्या पसंतीच्या वस्तू खरेदी करणे सुलभ होईल यावर त्यांनी भर दिला. या बचत महोत्सवाचे लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय, युवक , शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी आणि उद्योजकांपर्यंत पोहोचतील असे मोदी यांनी नमूद केले. या उत्सवाच्या काळात प्रत्येक घरामध्ये आनंद आणि गोडवा वाढेल असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणा आणि जीएसटी बचत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. या सुधारणा भारताच्या विकासगाथेला गती देतील, व्यवसाय सुलभ करतील, गुंतवणूक अधिक आकर्षक बनवतील आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्याला समान भागीदार बनवेल असे त्यांनी अधोरेखित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.तेलंगणातील हैदराबाद येथे आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
May 18th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील हैदराबाद येथील आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवो, अशीही पंतप्रधानांनी सदिच्छा व्यक्त केली आहे.