पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी राजस्थानला भेट देणार

February 27th, 03:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील अजमेरला भेट देणार आहेत. 28 फेब्रुवारी सकाळी साधारण 11:30 वाजता पंतप्रधानाच्या हस्ते 16,680 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ , उद्घाटन आणि पायाभरणी होईल. या निमित्ताने ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये नगरविकास, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते, सिंचन, ऊर्जा आणि औद्योगिक पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.