‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली
March 07th, 10:02 am
‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोस सरकार आणि तेथील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार 1.4 अब्ज भारतीय तसेच भारत आणि बार्बाडोस यांच्यातील दृढ संबंधांना समर्पित केला आहे.