महान क्रांतिकारक मंगल पांडे यांना पंतप्रधानांकडून अभिवादन
July 19th, 10:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक मंगल पांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, त्यांचे धैर्यपूर्ण जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागवते. त्यांच्या शौर्यगाथेतून देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळत राहील.पंतप्रधानांनी थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
July 15th, 12:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान आणि राष्ट्र उभारणीसाठी आपले जीवन समर्पित करणारे एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले. शिक्षण, समावेशक विकास आणि वंचितांचे कल्याण याप्रति थिरू के. कामराज यांची अतूट वचनबद्धता अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली
June 28th, 10:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले की, देशाच्या इतिहासातील एका अत्यंत कठीण कालखंडात पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
June 26th, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. त्यांच्या लेखणीने भारतीयांच्या अनेक पिढ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना व सांस्कृतिक अभिमानाची अनुभूती जागृत केली, असे सांगत त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे एक महान साहित्यिक म्हणून स्मरण केले.राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
June 26th, 12:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्यांना पंतप्रधानांची आदरांजली
June 25th, 10:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली आणि आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असल्याचा उल्लेख केला. या काळात मूक न राहता संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्य आणि चिकाटीही दिसून आली, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना वाहिली आदरांजली
May 27th, 08:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.पंतप्रधानांनी आदि शंकराचार्यांना आदरांजली वाहिली
April 21st, 01:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदि शंकराचार्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, त्यांची गहन शिकवण, विचार आणि अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान जगभरातील असंख्य लोकांना मार्गदर्शन करत आले आहे. तसेच, आध्यात्मिक विचारांना पुनरुज्जीवित करण्याचे आणि देशभरात आध्यात्मिक केंद्रे स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न चिरस्थायी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे ज्ञान आपला मार्ग प्रकाशित करत राहो आणि सत्य, करुणा व सामूहिक कल्याणाप्रती असलेली आपली वचनबद्धता अधिक दृढ करो, असेही मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसव जयंती निमित्त जगद्गुरु बसवेश्वर यांना वाहिली आदरांजली
April 20th, 09:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसव जयंती निमित्त जगद्गुरु बसवेश्वर यांना आदरांजली वाहिली.पंतप्रधानांकडून संसद संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
April 14th, 11:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संसद संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बागेतील शहीदांना वाहिली आदरांजली
April 13th, 09:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जालियनवाला बागेतील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांचे बलिदान हे आपल्या लोकांच्या अदम्य जिद्दीची एक प्रबळ आठवण म्हणून कायम स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून संसद परिसरात अभिवादन
April 11th, 11:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संसद भवन परिसरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.पंतप्रधानांनी प्रकाश पुरब निमित्त श्री गुरु तेग बहादूर जी यांना वाहिली आदरांजली
April 07th, 10:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पुरबच्या पवित्र प्रसंगी आपल्या संस्कृतीतील एक महान आध्यात्मिक व्यक्तिमत्व श्री गुरु तेग बहादूर जी यांना आदरांजली वाहिली.पंतप्रधानांचे श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींना अभिवादन
March 31st, 10:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजींनी सेवाभाव व अध्यात्मासाठी आयुष्य अर्पण केले. त्यांचा कार्याचा समाजमनावर अमीट ठसा उमटला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. आदरणीय स्वामीजींनी अनेक शैक्षणिक संस्थांची व संशोधन केंद्रांची स्थापना केली. लोकांना शिक्षणातील आनंद समजावून सांगण्याप्रती ते वचनबद्ध होते असे मोदी यांनी अधोरेखित केले.श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली
March 30th, 09:50 am
भारतमातेचे धाडसी सुपुत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले की त्यांच्या क्रांतिकारी संकल्पनांसह त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक नवी जागृती घडवून आणली. “त्यांचे जीवन आणि आदर्श देशातील प्रत्येक पिढीला देशसेवेसाठी प्रेरित करत राहतील,” मोदी पुढे म्हणालेदांडी यात्रेत सहभागी झालेल्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
March 12th, 10:34 am
आजच्याच दिवशी 1930 मध्ये झालेल्या दांडी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.पंतप्रधानांकडून महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमीत्त अभिवादन
February 15th, 02:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. “सत्य, अहिंसा आणि उच्च नैतिक मूल्यांचा संदेश प्रसारित करून त्यांनी समाजात नवचेतना निर्माण केली. त्यांचे प्रेरणादायी जीवन देशातील जनतेला सदैव मार्गदर्शन करत राहील,” असे मोदी यांनी म्हटले.पंडित दीनदयाळ उपाध्यायजींना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
February 11th, 10:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. सद्गुणांच्या मूल्यांमध्ये रुजलेली त्यांची तत्वे आणि विचार देशाच्या प्रत्येक पिढीसाठी तेजोमय मार्गदर्शन करत राहतील असे मोदी यांनी म्हटले आहे.थोर संत गुरू रविदास महाराज यांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली
February 01st, 09:15 am
थोर संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या विचारांमध्ये न्याय आणि करुणेची भावना सर्वोच्च स्थानी होती, आणि तीच आपल्या सार्वजनिक कल्याणकारी योजनांचा गाभा आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रज्वलित केलेला सामाजिक सलोखा आणि सद्भावनेचा दीप, देशवासियांचा मार्ग नेहमीच प्रकाशमय करेल, मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वाहिली आदरांजली
January 30th, 01:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर राष्ट्रपिता गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बापूंचे कालातीत आदर्श आपल्या राष्ट्राच्या वाटचालीस मार्गदर्शन करत आहेत. आम्ही त्यांच्या तत्त्वांप्रमाणे आणि न्याय, सलोखा तसेच मानवतेच्या सेवेवर आधारित भारताच्या निर्मितीसाठी आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.